भिवंडी महापालिकेचा विकास दर्शक 942 कोटीचा फुगीर अर्थसंकल्प सादर

भिवंडी

.

पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणार वैद्यकीय आरोग्य सेवा सुधारणेवर भर

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास घडावा यासाठी महानगरपालिका आयुक्त प्रशासनाने आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा महापालिकेचा सन 2023- 24 चे सुधारित अंदाजपत्रक 796 कोटी 35 लाख 17 हजार मात्र तयार करण्यात आले आहे तसेच सन 24 -25 मध्ये महापालिकेचे प्रारंभिक शिल्लक 161 कोटी 97 लाख 93 हजार अपेक्षित असून एकूण उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह 942 कोटी 49 लाख 26 लाख मात्र अपेक्षित धरण्यात आलेले आहेत.वर्ष अखेर 2 कोटी ५२ लाख २८ हजार शिलकीचा अर्थसंकल्प  तयार केला आहे.पालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी किरण तायडे यांनी पालिका प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांना सादर केला आहे. प्रसंगी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, विठ्ठल डाके,उपायुक्त (मुख्यालय) दीपक झिंजाड,उपायुक्त प्रणाली घोंगे,मुख्य लेखापरीक्षक मयूर हिंगाणे शहर अभियंता सुरेश भट अदि अधिकारी विभाग प्रमुख उपस्थित होते.           

  पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले  होते. त्यावेळेला हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भिवंडी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळावा या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने सन 2024 – 25 च्या अर्थसंकल्पात एकात्मिक पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक एक अ (25 एमएलडी) या योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या 16 पाण्याच्या टाक्यांपैकी दोन टाक्या वापरात येत आहेत त्यामुळे आता लवकरच अन्य पाच पाण्याच्या टाक्या चा वापर करून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असणार आहे तसेच केंद्र शासन पुरस्कृत अमृत  अभियाना अंतर्गत पाणीपुरवठा (100 एम. एल.डी) प्रकल्पास पालिका प्रशासनाने हिस्सा पोटी 15 कोटी रुपयांची तरतूद ठेवली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी आयोजित पत्रकार परिषद दिली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कम्पेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणे,पाच सार्वजनिक शौचालय बांधणे, 5 युरीनल्स बांधणे व 31 ते 33 वैयक्तिक शौचालय बांधण्याकरता अनुदान देणे बाबतीत तरतूद करण्यात आली आहे.

मला निसारण प्रकल्पासाठी तीन एसटीपी प्लांट कार्यान्वित करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अजय नगर येथील हिंदू चिरशांती स्मशानभूमी मध्ये गॅस दाहीनी ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील बीजीपी  हॉस्पिटल मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे कामे 50 लाखाची तरतूद करण्यात आली असून अपारंपारिक ऊर्जा स्तोत्रापासून वीज निर्मिती व पर्यावरण पूरक वीज तयार करणेचा मानस आहे,तसेच बीजीपी दवाखान्यात 50 खाटांचा दवाखाना कार्यान्वित करण्याकरीता चार कोटीची तरतूद तसेच तीन कोटी रुपयाचे औषधी व इतर उपकरणे खरेदी करण्याकरता तरतूद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणे व परिसर व सुशोभीकरण करणे करता शासनाकडून तीन कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.
जीआयएस मॅपिंग मार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्या मालमत्तेवर कर आकारणी करणे व महापालिकेचे महसूल उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत सात कोटी व नगररोत्थान
करता 9 कोटी पालिकेचा हिस्सा या तरतूद करण्यात आली आहे. शहरातील एकूण 20 किलोमीटर लांबीचे 82 सिमेंट काँक्रीटचे रस्ते सन 2024 – 25 मधील मूलभूत सुविधा व महाराष्ट्र सुवर्ण जयंतीनगररोत्थान अभियानांतर्गत शासन निधीतून तयार करण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका शाळा इमारती बळकटीकरण करणे व बँचेस पुरवणे याकरता दीड कोटी तरतूद ठेवण्यात आली असून 1800 बँचेस पुरवण्याच्या उद्दिष्ट तरतूद करण्यात आले आहे.या वर्षात स्व.मीनाताई ठाकरे नाट्य गृहाचे नूतनीकरण करणे करीता 15 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे मागणी केली असून त्याचे काम सुरू आहे.
शहरातील तीन बेघर निवारा केंद्र कार्यान्वित करण्यात ठेवणे देखभाल व दुरुस्ती कामी 60.40 कोटीचे लक्ष तरतूद ठेवण्यात आली आहे अग्निशमन विभागाकरता शहराचे शहरांमध्ये उंच उभ्या राहणाऱ्या उंच इमारती याकरता आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत हाय राईस फायर टॉवर वाहन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेला आहे. याकरता शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार 
असल्याची माहिती प्रशासक अजय वैद्य यांनी दिली.
अर्थसंकल्पातूनशहराचा विकास करण्याचा मानस व्यक्त केला आहे. चौकट सन 2023 – 24 मध्ये झालेली उल्लेखनीय कामे..
अग्निशमन विभागाकरता नवीन तीन फायर फायटिंग बाईक दोन मिनी वॉटर टेंडर व सदन सामग्री खरेदी करण्यात आलेले आहेत. पाणीपुरवठा विभागाकरता चार टँकर खरेदी करण्यात आले. आरोग्य विभागाकरता तीन जेसीबी करण्यात आले. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत हॉस्पिटल बीजेपी इमारतीचे बांधकाम व चार नागरी आरोग्य केंद्र बांधण्यात आले दिव्यांग लाभार्थींना पुढील प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आले 65 वार्षिक वार्षिक वीस हजार प्रमाणे उदरनिर्वाह भत्ता, दहा लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पन्नास हजार प्रमाणे व्यवसायाकरिता अर्थसहाय्य, 15 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.तीन लाभार्थ्यांना प्रत्येकी 25000 प्रमाणे शैक्षणिक साहित्य उपकरणे खरेदीकामी अनुदान देण्यात आले दोन लाभार्थ्यांना प्रत्येकी 25000 प्रमाणे सहाय्यक उपकरणे खरेदी काम अनुदान देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *