भिवंडी  लोकसभा मतदार संघात 4 जून रोजी मतमोजणी निवडणूक यंत्रणा  सज्ज –

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली माहिती. भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीची निवडणूक मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहामध्ये व सौदाह्य वातावरणात संपन्न झाली आहे.त्यामुळे आता मंगळवार 4 जून 2024 रोजी निवडणूक मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार असल्याची चर्चा रंगत असतानाच भिवंडी  लोकसभा मतदार संघातील शासकीय निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती 23, भिवंडी […]

Continue Reading

अनाधिकृत नळ कनेक्शनवर भिवंडी पालिकेची धडक कारवाई

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील गटार व मोठ्या नाल्यातून शेकडो अनाधिकृतपणे नळ कनेक्शन पाईपलाईन व्दारे कार्यरत आहेत.याबाबत पालिका प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र राजकीय आश्रय असल्याने या अनाधिकृत नळ कनेक्शन पाईप लाईनवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.असे असतानाच शहरातील नारपोली परिसरातील गटार व मोठ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत नळ कनेक्शन पाईपलाईन असल्याचे महापालिका […]

Continue Reading

भिवंडीतील गटार,नालेसफाई कामात हलगर्जीपणास केल्यास कारवाई करू – आयुक्त वैद्य

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील गटार व नाले सफाई चे काम महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या आदेश निर्देशानुसार योग्य चांगल्या पद्धतीनेहोणे आवश्यक आहे.100 % टक्के नाले सफाई व मुख्य गटार सफाई काम करून घेण्या मध्ये कोठेही हयगय, कसूर अथवा हलगर्जी पणा होता कामा नये जर आपणाकडून 100 % टक्के उत्तम प्रकारे नाले सफाई […]

Continue Reading

भिवंडीतील टोरेंट पॉवर कंपनीच्यावतीने ग्राहक संवाद कॅम्पचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात वीजपुरवठा व विज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्यावतीने वीज ग्राहकांच्या विज बिल संदर्भात अडीअडचणी समस्यांचे निराकरण व नवीन वीजबील दर, वीज कनेक्शन बाबतीत ग्राहकांना मार्गदर्शन यासाठी वीज ग्राहक संवाद उपक्रम शहरातील वंजारपाटी नाका परिसरातील आमपाडा ग्राहक सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुमारे 300 हून अधिक […]

Continue Reading

भरघोस मतदानामुळे भिवंडीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा जोरदार चर्चा सुरू

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात 12 लाखाहून अधिक उस्फूर्तपणे मतदान झाल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदी आनंद वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा जातीय समीकरण झाल्याने अटीतटीचा सामना होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत,भाजपा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळामामा ) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघां मध्ये […]

Continue Reading

भिवंडी बाजारात बनावट एव्हरेस्ट,मॅगी मसाला विक्री करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी केली अटक,एक लाखाचा मुद्देमाल जप्त 

भिवंडी (भानुदास भसाळे  ) भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यास असलेल्या शांतीनगर परिसरातील झोपडपट्टी विभागात मोठया प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे तक्रारी होत आहेत. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटककरण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी धाडसी कारवाई करीत बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा  दोघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे एक लाख 8 हजार […]

Continue Reading

केंद्रध्यक्ष मतदान पेटया  घेऊन पोलीस बंदोबस्तात केंद्रावर रवाना

भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मतदारसंघाचा घेतला आढावा… भिवंडी   ( शरद भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात  सोमवार 20 मे 2924  रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.आज रविवार सकाळी भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सह निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे,सह निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांच्याशी […]

Continue Reading

वोट जिहाद’लावोट यज्ञ’ने चोख उत्तर देणार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत परखड इशारा

भिवंडी (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून वोट जिहाद’ घडविले जात आहे. त्यालावोट यज्ञ’ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त वोट’ एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्येसमिधा’ म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे  भिवंडीत झालेल्या सभेत व्यक्त केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे […]

Continue Reading

आपले नाव शोधा..आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा –भिवंडी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात  येत्या म्हणजे सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होत आहे.त्यामुळे निवडणूक प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे.रविवारी  मतदान केंद्रावर सर्व मतदान पथके रवाना होणार आहेत. त्यामुळे आता मतदार यांची जबाबदारी आहे कि मतदानाला जाण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने आपले नाव कोणत्या केंद्रावर आहे, मतदान केंद्र कोठे आहे […]

Continue Reading

एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज – शरद पवार..

महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी भिवंडी ( प्रतिनिधी ) देशाची घटना बदलण्यासाठी 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्तकेले आहे.       राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभामतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे […]

Continue Reading