भिवंडीतील टोरेंट पॉवर कंपनीच्यावतीने ग्राहक संवाद कॅम्पचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात वीजपुरवठा व विज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्यावतीने वीज ग्राहकांच्या विज बिल संदर्भात अडीअडचणी समस्यांचे निराकरण व नवीन वीजबील दर, वीज कनेक्शन बाबतीत ग्राहकांना मार्गदर्शन यासाठी वीज ग्राहक संवाद उपक्रम शहरातील वंजारपाटी नाका परिसरातील आमपाडा ग्राहक सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुमारे 300 हून अधिक ग्राहकांनी सहभाग घेऊन माहिती घेत सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदीयानी यांनी दिली.


     भिवंडी शहरातील नागरिकांना नवीन वीज पुरवठा कनेक्शन,वीजबिल समस्या तसेच एप्रिल महिन्या पासून लागू झालेले नवीन वीज दर, पीडी मिटर संदर्भात  ग्राहकांच्या महावितरणच्या थकबाकीसाठी विशेष व्याज माफी योजना “डीएफ स्पेशल ऍम्नेस्टी स्कीम 2023 ”, प्रलंबित कनेक्शन, विजिलेंस, बिल संबंधित आणि डिजिटल पेमेंट सेवा अशा विविध प्रकारची माहिती आणि जनजागृती करण्याचे हेतूने शहरातील आमपाडा येथील वीज ग्राहक सेवा केंद्र येथे ग्राहक संवाद उपक्रम नुकताच राबविण्यात आला.टोरेंट पॉवर कंपनीचे महाव्यवस्थापक अरुण राव,अंकित साहा,बिनु सेतुमाधवन,
राघवेंद्र राव, विजय राणे,जनसंपर्क अधिकारी सुधीर देशमुख,चेतन बदियानी व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.त्यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करीत मार्गदर्शन केले. या उपक्रमात शहर व ग्रामीण भागातील शेकडो वीज ग्राहकांनी नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *