राहुल कराळे यांची दिल्ली विकास प्राधिकरण आयुक्तपदी नियुक्ती..

ठाणे

ठाणे जिल्हा शांतिदूत परिवार पदाधिकाऱ्याकडून अभिनंदन..

ठाणे ( शरद भसाळे ) भारतीय संरक्षण लेखा सेवा (IDS) मधील २०११ बॅचचे वरिष्ठ अधिकारी राहुल एकनाथ कराळे यांची दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) येथे आयुक्त (कार्मिक) अर्थात Commissioner (Personnel) या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शांतीदुत परिवार व पोलीस शांतता समीती ठाणे जिल्हा सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राहुल कराळे हे शांतीदूत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव यांचे जावई आहेत.
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार राहुल कराळे यांची नियुक्ती केंद्रीय प्रतिनियुक्ती योजनेंतर्गत करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. कराळे यांना संरक्षण लेखा, आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांनी संरक्षण लेखा विभाग, भारतीय नौदलाचे वित्तीय सल्लागार तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगासाठी निरीक्षक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे आपली जबाबदारीने काम केले आहे.त्यामुळे अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. राहुल कराळे यांच्या नियुक्ती झाल्या बद्दल शांतीदुत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव,डॉ.सुरेश राठोड,
शांतीदुत परिवार ठाणे जिल्हाध्यक्ष पत्रकार शरद भसाळे,भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियन सचिव श्रीपत तांबे, अध्यक्ष भानुदास भसाळे, रविंद्र वारघडे,चंद्रकांत भोईर,विवेक मालसे, देवेंद्र मोहीते, वसीम खान,अनिल फडतरे अदि मान्यवर शांतीदुत परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून राहुल कराळे यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांना पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.