भिवंडीत दिवाळी उत्सव महिला बचत गटाच्या विक्री केंद्राच महापौर नारायण चौधरी हस्ते शुभारंभ

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे) महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील आहे त्याच अनुषंगाने महिलांना प्रोत्साहन व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भिवंडी महापालिका प्रशासन बचतगट माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
येत्या काळात महिला बचत गटांच्या विक्री केंद्रासाठी हक्काची जागा महापालिका प्रशासन लवकरच उपलब्ध करून देईल असे आश्वासन महापौर नारायण चौधरी यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे.


भिवंडी पालिकेच्या समाज कल्याण विभाग महिला व बालकल्याण समितीच्या सहकार्याने दिवाळी निमित्त महिला बचत गटाच्यावतीने दिवाळी फराळ, कपडे आणि विविध वस्तू विक्री केंद्र प्रभुआळी येथील दगडी शाळा प्रांगणात उभारण्यात आले आहेत या केंद्रांचे उद्घाटन शुभारंभ महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आला.प्रसंगी अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे, प्रभाग समिती सभापती अँड वैभव भोईर,भाजपा गटनेता संतोष शेट्टी,
नगरसेविका रोमा निलेश आळशी,मलिक मोमिन,
सुगंधा टावरे,मयूर पाटील,एकता शहर स्तर संघाच्या अध्यक्ष चंदा बॅनर्जी,सहाय्यक आयुक्त नितीन पाटील,प्रभाग अधिकारी गिरीश गोष्टेकर,विभाग प्रमुख मिलिंद पळसुले,जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.


भिवंडी पालिका समाजकल्याण विभागातर्फे महिला व बालकल्याण व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत एकता शहर स्तर संघाच्या सहकार्याने ३० महिला बचत गटांच्या दिवाळी उत्सव वस्तू विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून ज्या मध्ये दिवाळीतील फराळ,दिवे,गृह सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. विक्री केंद्राच्या माध्यमातून पारंपरिक दिवाळी साजरी करीत असल्याचा आनंद सर्व भिवंडीकरांना दिवाळी उत्सवातून मिळणार आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी परिश्रम घेऊन दिवाळी फराळ व विविध वस्तू तयार करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले आहे ही कौतुकास्पद बाब आहे. महिलांना अधिक बळ व रोजगार प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच
साहित्य विक्री केंद्रासाठी हक्काची जागा पालिका प्रशासनाच्यावतीने लवकरच उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर नारायण चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली, ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान हे दिवाळी उत्सव विक्री केंद्र दगडी शाळा येथे सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान सुरू राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनवतीने सांगण्यात आली.