भिवंडी ( शरद भसाळे ) ऑन लाईन गेमिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील टोळीचा भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे, त्यांच्या जवळून ३२ मोबाइल फोन,४९ एटीएम कार्ड,४० सिमकार्ड, ४ लॅपटॉप आणि मोबाइल चार्जर यांसह अन्य साहित्य असा लाखो रुपये किमंतीचा माल जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उप आयुक्त डॉ.पवन बनसोड यांनी आज गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी भगवान दास या व्यक्तीने वर्क फ्रॉम होम चे आमिष दाखवून भिवंडीतील फिर्यादीसह त्याचे सात मित्र यांच्या कडील बँक पासबुक,एटीएम, सिमकार्ड,चेकबुक याचा सर्व तपशील स्वतःकडे घेऊन त्या माध्यमातून तक्रारदारांचा विश्वासघात करून त्यांच्या बँक खात्यांचा उपयोग khiladi000003 @gmail. com,https:www.anna555.online व https: www.khiladi.biz./ home या गेमिंग साईड करीता वापरून खाते धारकांच्या खात्याचा वापर करून पैशांची देवान घेवाण करून खातेदारांची फसवणूक केली होती.या बाबत सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते व पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत डांगे,
पोलीस उपनिरीक्षक रामदास कोलते यांच्या पथकातील पोलिसांनी संशयितांच्या तांत्रिक तपासातून माग काढीत रॉयल पाम आयलँड ०८ आरे गोरेगाव मुंबई या इमारतीत छापा मारून तेथून अनिकेत यादव (वय २४,) रमेश मंडळ,( वय २६,दोघे रा. छत्तीसगड) खिलेश यादव,(वय २४ रा.झारखंड),कुंदन यादव,( वय २१,रा.बिहार), राजाराम राऊत,( वय २६, रा. झारखंड,)अतिश यादव,(वय २०,रा.बिहार,)
अशोक यादव,(वय २८ ,रा. बिहार राज्य) दिलीप यादव,(वय २८,रा.बिहार), जितेंद्र कुमार यादव,(वय २२,रा.बिहार ) संटू यादव, (वय २८ रा.बिहार) अशा विविध राज्यातील दहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता २६ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते हे करीत आहेत, आरोपींनी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून बँक खात्यांचा वापर करून पैशांची देवाणघेवाण कोठे केली आहे व या गुन्ह्यात आंतरराज्य टोळी कार्यरत आहे का याचा तपास पोलिस करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

