भिवंडी पालिकेत नऊ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती.कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) गेल्या महिनाभरापासून राजकीय वादग्रस्त चर्चेत राहिलेल्या भिवंडी शहर महानगर पालिकेच्या नऊ स्वीकृत सदस्य (नगरसेवक)नियुक्ती पदाची प्रक्रिया महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष महासभेत मोठ्या उत्साहात महापालिकेच्या सभागृहात संपन्न झाली.
महापौर नारायण चौधरी व आमदार महेश चौघुले यांनी नवनिर्वाचित सदस्य (नगरसेवक) यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
भिवंडी महापालिकेत महापौर,उपमहापौर व सभापती पदाच्या निवडणूक संपन्न झाल्यानंतर नऊ
स्वीकृत सदस्य (नगरसेवक) निवड नियुक्ती बाबतीत गेल्या महिना भरापासून चर्चा सुरू होती.शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि कोणार्क विकास आघाडी तर्फे कोण स्वीकृत सदस्य होणार याबाबत जोरदार शर्यत सुरू होती,काँग्रेस पक्षाकडून निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य पद देण्यात यावे अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली होती,मात्र शहर अध्यक्षांची मागणी धुडकावून महापालिका गटनेत्यांने मनमानी करीत
आपल्या पसंतीचे तीन कार्यकर्तेना सदस्यं पद बहाल करून शहर अध्यक्षांना जोरदार चपराक दिली. महापालिकेच्या सभागृहात महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांनी काँग्रेस पक्षाचे गटनेते यांच्या कडून आलेल्या शिफारसी नुसार
इम्रान मोहम्मद एच. अन्सारी,अरफात ए. शेख,व सलीम अहमद शेख यांची नियुक्ती केली तर भारतीय जनता पक्षा कडून जेष्ठ कार्यकर्ते सुगंधा टावरे,रवी सावंत,शिवसेना कडून संजय काबुकर,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष कडून गिरीश म्हात्रे,समाजवादी पक्षाकडून भरत जंगलानी आणि कोणार्क विकास आघाडीकडून मयूर विलास पाटील यांच्या नावांची घोषणा केली.या निवडीच्या घोषणेनंतर महापौर आणि सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांचा जयघोष करीत त्यांना पुष्पगुच्छ शुभेच्छा देत अभिनंदन केले,यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढून महापालिका कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा केला.महापालिका इमारत समोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोर केली निदर्शने,काँग्रेस पक्षाच्या गटनेत्याने पक्षाबाहेरील व्यक्तींची शिफारस स्वीकृत सदस्य (नगरसेवक) पदासाठी केल्याने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार सुरेश टावरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका
मुख्यालयासमोर निदर्शने करून तीव्र नाराजी व्यक्त केली.