भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील प.रा. विद्यालय संकुलातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका अनिता सुतार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना व सर्व सामान्य नागरिकांना पौष्टिक आहारात रानभाजी चे महत्त्व कळावे आणि त्याची संपूर्ण माहिती असावी या भूमिकेतून आज शनिवार रोजी सकाळी शाळेच्या सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, शालेय विद्यार्थी व पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

शहरातील ब्राह्मण आळी येथील प.रा. विद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकत्याँ गुणवंती प्रदीप राका यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष अतिथी म्हणून शालेय समिती अध्यक्ष शाम सिंगासणे,मुंबई जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्था कार्यध्यक्ष प्रदिप राका,जेष्ठ पत्रकार शरद भसाळे पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता सुतार,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पाटील,संस्था संचालक व मुख्याध्यापक सुनील पाटील,जे.एन.पाटील, एकनाथ गायकवाड,
अनुश्री गद्रे, शालेय विद्यार्थी व महिला, शिक्षकांसह मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात कंटोळी,
टाकळा,आळू भाजी,
भारंगी,करली,भाजी,खुरासनी,अंबाडी,वली,
गाबोळी,कवला,मोतूंग नाली, ताक अशा विविध आरोग्यदायी रानभाज्यांची माहिती व त्यांचे बहुविध उपयोग काही विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थितीतांना दिली.पालेभाज्या व रानभाज्या या आरोग्यासाठी पूरक असतात त्यामुळे या भाज्यांचा जेवणामध्ये जास्तीत जास्त वापर करून आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवावे असे आवाहन गुणवंती राका यांनी व्यक्त केले. हा महोत्सव उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे उपस्थितीत पाहुण्यांनी विशेष कौतुक केले.महोत्सवात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते त्यामुळे उपस्थितीतांनी रानभाज्यांची माहिती आवर्जून घेतली.
अभिजात मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेच्या सभागृहात पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी तेथे भेट देऊन मान्यवर शिक्षकांचे कौतुक केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका अनिता सुतार शिक्षक वंदना वानखेडे,नूतन केणे, मनिषा जाधव,प्रसन्ना भोई, अनुश्री गद्रे, कर्मचारी अनिता सौदागर,सरीता गायकवाड,अंजली पतंगराव, देविका राठोड यांनी विशेष मेहनत घेतली.

