ढोल ताश्याचा गजरात जल्लोषात झाले गणपती विसर्जन सोहळा भिवंडीत थाटामाटात संपन्न…

भिवंडी

महापौर,पोलीस आयुक्तांनी केले गणेश मंडळांचे स्वागत..

भिवंडी ( शरद भसाळे ) डी.जे वाद्यास आराम देत काही गणेशोत्सव मंडळांनी बँजो व ढोल ताश्याचा आधार घेत मोरया मोरया गाण्याचे तालावर नाचत व गणपती बाप्पा मोरया व पुढच्या वर्षी लवकर या’अशा जोषपुर्ण घोषणा देत गणेश भक्तांनी 12 दिवसीय गणपती मुर्ती चे मोठ्या उत्साहात भिवंडी शहर व ग्रामीण भागातील विविध नदी-तलावात विसर्जन केले.सार्वजनिक व घरगुती अशा सुमारे सात हजारांहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

पहाटे 4 : 40 वाजे पर्यंत हा सोहळा सुरु होता.मिरवणूक दरम्यान फटाक्याची जोरदार आतिषबाजी करून गणपती चा जयघोष करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापालिकेच्या महापौर नारायण चौधरी,आमदार महेश चौगुले व मान्यवर नगरसेवक,लोकप्रतिनिधी यांनी मिरवणुकीतील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपतीचे पूजन करून मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारीचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त व महिला नागरिकांनी गर्दी केल्याने ग्रामीण व शहर पोलीसांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळावर ड्रोन कँमेरा व सी.सी.टिव्ही कँमेरा लावण्यात आले होते.निघालेल्या मिरवणुकीत सुमारे दोन लाख नागरिक सहभागी झाले होते.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात हानामारी झाल्याने ऋषीकेश (राज) वगळ हा युवक जखमी झाला असुन त्यास खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली आहे. भिवंडी शहरातील भोईवाडा,
दर्गारोड येथून दुपारी 4 वा. वाजत गाजत गणेश मिरवणूकीस सुरवात झाली. घोडा गाडीस फुलांनी व विद्युत रोषणाई
सजविण्यात आलेल्या ट्रक, टेम्पो रिक्षा,व हातगाडी,रथावर वर गणेश मुर्ती ठेऊन वाजत गाजत ढोल ताश्याचा तालावर नाचत जल्लोषात मिरवणुकीला सुरवात झाली.या मार्गावरील हिंदुस्थानी मशिद येथे शिवशक्ती गणेश मंडळ व इतर मंडळाचे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे, पोलीस उपआयुक्त पवन बनसोड,हिंदुस्थानी मशिदी चे ट्रस्टी मुश्ताक मोमीन व गणेश महामंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी,मुस्लिम समाज बांधव आणि शांतता समीती सदस्यांनी गुलाब फुल देऊन मंडळाचे स्वागत केले.सदर मिरवणूक प्रभुआळी मंडई,तीनबत्ती चौक,शिवाजी नगर,
स्व.सिंधुताई वसंत भसाळे मार्ग,बाजारपेठ,कासार आळी, टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,वंजारपाटी नाका ते लोकमान्य टिळक व शेलार विसर्जन स्थळावर गेली तर धामणकर नाका, कामतघर,कल्याणरोड, पद्मानगर,भादवड अशा विविध ठिकाणाहून सुद्धा मिरवणुका निघाल्या होत्या.

सायंकाळी छ.शिवाजी महाराज चौकात महापौर नारायण चौधरी,आमदार महेश चौगुले व मान्यवरांनी मंडळाचे स्वागत केले.मंडळाचे कार्यकर्तेनी वहाळादेवी तलाव,शेलार घाट,टिळक घाट, फेणेघाट,कामतघर घाट,नारपोली तलाव, भादवड तलाव,कोनगांव व काल्हेर खाडीत अशा विविध ठिकाणी सुमारे 7 हजारांहून अधिक गणपती मुर्ती विसर्जन पहाटे 4: 40 वा..तलाव-नदी मध्ये करण्यात आले. तालुक्यातील काल्हेर कशेळी,राहनाळ, कोनगाव,खारबाव, खोणीगांव अशा विविध गावात विसर्जन शांततेत झाले.पहाटे पाच वाजेपर्यंत हा विसर्जन कार्यक्रम संपला.

या मिरवणूकीत तामिळ समाजाचेवतीने धार्मिक स्वरूपात काढण्यात आलेली लिंबू गणपती आकर्षण ठरली.संपूर्ण अंगावर तारा टोचून पाठीव लोखंडी हुक लाऊन रथ ओढत रात्री गणेश मुर्ती ची मिरवणूक काढण्यात आली होती.तर परोपकार व व्यापारी मित्र मंडळ या सामाजिक संस्थेच्यावतीने गणेश भक्तांना वडापाव व तर जय माता सेवा संस्थेचेवतीने चहा पाणी वाटप करण्यात आले. तसेच विविध सामाजिक संस्थाचेवतीने सुध्दा पाणी, सरबत वाटपाचे स्टाँल लावण्यात आले होते.