लोकसभेचे हंगामी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे निवासस्थानी केले गणेश दर्शन..

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात गणेश उत्सवाची धामधुम मोठ्या उत्साहामध्ये होत असून घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी देखावे उभे करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सामाजिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी श्री गणेश दर्शन घेण्यासाठी येत असून त्यांचे उत्साहामध्ये स्वागत केले जात आहे,भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या निवासस्थानी स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील खासदार तथा वक्फ बोर्ड सुधारणा सयुक्त समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष जगदंबिका पाल हे आपल्या परिवारासह आले होते,यावेळी त्यांनी देशाची प्रगती होवो आणि सर्वांना सुख शांती लाभो अशी प्रार्थना करून देवानंद थळे कुटुंबांना शुभेच्छा व्यक्त केल्या,


लोकसभेचे हंगामी अध्यक्ष जगदंबिका पाल हे परिवारासह अचानक शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी येणार असल्याची माहिती पोलीस व शासकीय अधिकाऱ्याना मिळताच शासन नियमानुसार त्यांच्या साठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जगदंबिका पाल गणेश दर्शनासाठी आल्याने थळे परिवाराचेवतीने प्रभू श्रीरामाची मूर्ती व सन्मान शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.दोन्ही कुटुंबीयांची उपस्थिती लाभल्याने या भेटीला विशेष आपलेपणा लाभला. बाप्पाच्या साक्षीने झालेली ही प्रेमळ भेट, स्नेहपूर्ण संवाद आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे क्षण कायम स्मरणात राहतील असे त्यांनी नमूद केले.
सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करण्यात आल्याची त्यांनी सांगितले.