खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात गेल्या 36 तासा पासुन पडत असलेल्या मुसळधार रिमझिम पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे रहिवासी नागरिक व रस्त्यालगत असलेल्या दुकानात पावसाचे व गटार नाल्याचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले,निजामपूरा पोलीस ठाणे चौकीत सुध्दा नाल्याचे पाणी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती.

रस्त्यावर सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असुन ठिकठिकाणी मंद गतीने वाहने चालत असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडी वाडा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.कामवारी नदी ओसडून वाहू लागली आहे. त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेने ठेकेदारां माफँत केलेला गटार व नालेसफाई कामाचा बोजवारा उडाल्याने शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा सुरू झाली पालिकेच्या गलथान कारभाराची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना पक्षासह सामाजिक कार्यकर्ते कडून होत आहे.
भिवंडी मुंबई नाशिक बायपास महामार्गावर रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे खोदलेल्या रस्त्यामध्ये पाणी साठल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे.
भिवंडीहून ठाण्याकडे जाण्यासाठी धिम्या गतीने वाहन चालत असल्यामुळे ट्रक, कंटेनर, अवजड वाहन व मोटरकार चे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ऐकून सततधार पाऊस पडत असल्याने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भिवंडी शहराला जोडणाऱ्या खाडीपार पुलावरून नदीचे पाणी वाहू लागल्याने व छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्याने कांबा,
काटई,जुनांदुरखी,
लाखीवली पारोळ फाटा अशा गांवाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे नोकरदार वर्ग व्यापाऱ्यांना घरीच थांबावे लागले आहे.कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरात पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदीकिनारी राहणारे म्हाडा कॉलनी नदी नाका या भागात पाणी साचल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पद्मानगर परिसर व कामतघर परिसरातील रोड चे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.खोदकाम केलेल्या रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने वाहन चालवताना चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. इदगाह रोड,
पद्मानगर धामणकर नाका रोड,वंजारपाटी नाका, म्हाडा काँलनी, खडक रोड,
शिवाजीनगर भाजीपाला मार्केट,
कासार आळी,ठाणगे आळी,छत्रपती शिवाजी महाराज चौक,कामतघर,
दरगाह रोड अशा विविध परिसरात सखल भागात पाणी साचल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
चौकट
महापालिकेच्या ठेकेदारांने कचरा उचलला नसल्याने कचरा कुंडीत व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पसरला होता. त्यामुळे ओल्या कचऱ्यास दुर्गंधी पसरली होती.त्यामुळे पादचारी नागरिकांना नाक मुठीत धरून ठेवण्याची पाळी आली होती. गटार व नाले योग्य प्रकारे सफाई न झाल्याने रस्त्यावर सांडपाण्याचे लोण वाहत होते.
नालेसफाई व गटार सफाई काम अर्धवट करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी बिल अदा करू नये अशी मागणी होत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या गलथान व भ्रष्ट कारभाराची कारभाराची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिध्दीक फक्की,
शिवसेनेचे सचिव गोकुळ कदम यांनी केली आहे.

