वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी..
भिवंडी (प्रतिनिधी) मुंबई नाशिक महा मार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संबंधित ठेकेदार यांना दिल्या.
यावेळी ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण,ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी,महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार,भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप,वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, एमएमआरडीए कार्यकारी अभियंता श्री.किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावी. कामे पूर्ण करावी,
तसेच या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडीयाबाबत चर्चा करून वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा मौलिक सूचना उपस्थित व संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.वाहतूक विभागाने या महामार्गावर वाहतूक कोंडी बाबतीत उपाययोजना करावी अशी सुचना देत पोलीस उपाआयुक्त राठोड यांच्याशी चर्चा केली.