मुरबाड विधानसभा निवडणूक समन्वयक पदावर भरत पाटील यांची नियुक्ती..भिवंडी जल्लोष..

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते भरत पाटील यांची प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरबाड विधानसभा निवडणूक 2024 करीता विधानसभा महायुती भाजप समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 
भिवंडी व मुरबाड येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष व्यक्त केला आहे.दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार करून भाजप महायुती चे उमेदवाराला बहुमतांनी विजयी करण्याचा विशेष प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया भरत पाटील यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात भाजपाचे जेष्ठ सक्रीय बलाढ्य नेते म्हणून भरत पाटील 
ओळखले जात असुन गत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत त्यांनी भरीव कामगिरी केल्याने केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षाने त्यांना प्रदेश कार्यकारणीत स्थान दिले आहे.
भिवंडीत राहत असताना गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या पत्नीला जव्हार येथून सदस्य म्हणून निवडून आणण्याची किमया त्यांनी केली आहे.तसेच  ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी पार करून भिवंडी सह ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर भाजप पक्षाची सत्ता प्रस्थापित केली आहे.असे असताना आता भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरत पाटील यांची मुरबाड विधानसभा निवडणूक 2024 करिता  ‘विधानसभा महायुती भाजपा समन्वयक ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे पत्र दिले आहे. या अंतर्गत आपल्या पक्षातील व महायुती मधील मित्र पक्षांचा पदाधिकाऱ्यांशी योग्य समन्वय व सुसंवाद ठेवत पक्ष कार्य करावे व निवडणूक काळातील समन्वय कामकाजाचे पुढील नियोजन ठरवावे अशा सुचना दिल्या आहेत. भरत पाटील यांच्या नियुक्तीने पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *