भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच भारतीय जनता पक्षाच्यावतीने भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश चौगुले यांच्यावर विश्वास व्यक्त करीत तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन हँट्रीक साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेनी
महेश चौगुले यांच्या नावांची घोषणा होताच भिवंडीत जल्लोष व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला.

भिवंडीतील पुर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे प्रचाराचे पडघम सुरू असतानाच कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत विविध अटकळी बांधल्या जात होत्या त्यामुळे भाजपातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मतदार
व पक्षातील पदाधिकाऱ्यां मध्ये उत्सुकता निर्माण झाली होती असे असतानाच रविवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान भाजप आमदार चौगुले यांना पुन्हा एकदा पक्षाकडून तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.दोन वेळा विजय संपादन केल्या नंतर हॅट्रिक साधण्याची संधी भाजपा कडून महेश चौगुले यांना दिली आहे.महेश चौगुले यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सायंकाळी भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महेश चौगुले यांचे समर्थक यांनी एकच जल्लोष साजरा केला.
फटाक्याच्या आतषबाजी करीत या ठिकाणी चौगुले यांची मिरवणूक काढण्यात आली.या माध्यमातून उमेदवारी सार्थकी लावण्यासाठी सर्वांच भाजपा पदाधिकारी जोशामध्ये जल्लोषात सहभागी झाले होते.
चौकट
भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह मान्यवरांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करीत
तिसऱ्यांदा देऊन पक्षाने जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे त्यामुळे मी सर्वाचा आभारी आहे.त्यामुळे या निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करून हॅट्रिक साधणार असा विश्र्वास महेश चौगुले यांनी यावेळी व्यक्त केला.