भिवंडी लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे – महेश चौगुले

भिवंडी

भिवंडीतून हॅट्रिक करणार… विनोद तावडे

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे.या मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले तर यश नक्कीच मिळेल आणि महेश चौगुले यांना हॅट्रिक करण्याची संधी लाभेल असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे.


भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार महेश चौगुले यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,भाजपा निरीक्षक खासदार कविता पाटीदार, भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील, शिवसेना शहराध्यक्ष सुभाष माने,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यसह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विजय संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यालयात बसून न राहता जनतेमध्ये जाऊन केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजना माहिती देत असताना याचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना भेटून त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे असे सांगत असतानाच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खाली दहा वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.महायुती सरकार हे विकास करणारे शासन आहे. लाडकी बहीण योजने मुळे हजारो महिलाचे भवितव्य उज्वल झाले आहे.विरोधक खोटा प्रचार करून शासनाला दोष देत आहेत. मात्र महायुती सरकार हे विकसीत भूमिका ठेवून काम करीत आहे असे मत व्यक्त करूनत्रही योजना काँग्रेस काळात सुरू झाली असती तर जनते पर्यंत पैसे पोहोचले
नसते अशी टिका आरोप विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमास भाजपा शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *