युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना संरक्षणासाठी भिवंडीत ” मॉक ड्रिल “

भिवंडी

सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज.

भिवंडी ( शरद भसाळे  ) काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी जवानांनी अतिरेक्यां
विरोधात ऑपरेशन सिंन्दुर ही विशेष मोहीम राबवून यशस्वी कारवाई व्दारे प्रतिउत्तर दिले आहे. पाकिस्तान कडून येणार ड्रोन हल्ले नष्ट करीत भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ड्रोन हल्ले सुध्दा नष्ट करीत आहेत. त्यामुळे सध्या सिमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने अशी गंभीर परिस्थिती आपल्या शहरात उद्भवलीतर त्याचा सामना सर्वसामान्य जनतेने कसा करावा यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनां
नुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्या साठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येत आहे.


    आज शनिवार सायंकाळी भिवंडी शहरातील कामतघर येथील मनपाचे वऱ्हाळदेवी माता मंगल भवन येथे ठाणे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शना खाली उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या
उपस्थितीत जवानांनी ” माँक ड्रिल ” मोहीम केली. यावेळी आमदार महेश चौघुले,पोलीस उपाआयुक्त मोहन दहीकर,मनपा अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,एसीपी सचिन सांगळे,भिवंडी अग्निशमन दल,ठाणे आपत्ती व्यवस्थापन टीम, महाराष्ट्र नागरी सुरक्षा बल,
होमगार्ड,राज्य सुरक्षा बल,पोलीस व मनपा आपत्ती विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


   यावेळी सर्व प्रथम सायरन वाजवून या मॉक ड्रिलला सुरुवात करण्यात आली. युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ गडबड अथवा घाबरून न जाता एका जागी स्थिर राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.त्यांनतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अथवा जखमींना कशा प्रकारे मदत करायची याची प्रात्यक्षिके जवानांकडून देण्यात आली. या ठिकाणी हवाई हल्ला व बॉम्ब हल्ल्याची सूचना नागरिकांना देण्यात आल्या,अशा परिस्थिती मध्ये सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी काय करावे याबाबत प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविणे,संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी,
अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे,त्यांना प्रथमोपचार करणे, अशी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे,अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.तहसिलदार अजय घोळवे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते.युद्धजन्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, नागरिकांनी घाबरून न जाता अशा परिस्थितीशी कशा पद्धतीने सामना करावा यासाठी या अभ्यास मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आल्याची माहिती भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *