भिवंडी गुन्हे शाखेची धडक कारवाई 
45 लाखाच्या बनावट नोटासह 6 जण गजाआड

भिवंडी


लँपटाँप,प्रिंटर सह साधन सामुग्री जप्त.

भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात असलेल्या अवचित पाडा या भागात बनावट नोटा आपल्या कब्जात बाळगून त्यांची खऱ्या नोटांशी अदलाबदल करण्यासाठी आलेल्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने चार दिवसापूर्वी सुमारे 30 लाख रुपयांची रोकड, मोबाईल फोनसह  ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून या गुन्हयात आणखी तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे,त्यांच्या कडून सुमारे 15 लाख रुपये व बनावट नोटा छापण्यासाठी वापर केलेला लॅपटॉप, प्रिंटर,बनावट नोटांचे खऱ्या नोटांच्या मापात कटींग करण्यासाठी वापरलेले कटर,
नोटा छापण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर असे ऐकुन आता 45 लाख रूपये व मुद्देमाल जप्त केला आहे.


      सुरज तानाजी शेंडे,भरत वाळकु सासे,स्वप्नील जगदीश पाटील, रामदास शालिक दळवी,विजय सुदाम कर्णेकर उर्फ विकी, शेखर रामदास बत्तीन असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत.
याबाबत पोलिस सुत्रांनी माहिती दिली कि भिवंडी शहर परिसरात काही इसमांची टोळी  बनावट नोटा तयार करून त्या खऱ्या नोटांशी अदलाबदल करून गैरकृत्य करीत आहेत त्यामुळे मिळालेल्या माहिती वरून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण,गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव,एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शना खाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे,सपोनि  धनराज केदार,श्रीराज माळी,
पोउनि.रविंद्र पाटील,
राजेश शिंदे,सुधाकर चौधरी, पोहवा सुनील साळुंखे,
सुदेश घाग,प्रकाश पाटील,साबीर शेख,प्रशांत राणे,राजेश गावडे, किशोर थोरात,निलेश बोरसे,सचिन
जाधव,माया डोंगरे,दक्षता सुतार, सायली गंभेरा,अमोल इंगळे,भावेश घरत, विजय कुंभार या पोलीस पथकाने चार दिवसापूर्वी भिवंडीतील अवचितपाडा या ठिकाणी सापळा रचून तिघांना 500 रूपये दराच्या भारतीय चलनातील बनावट नोटांची 60 बंडल प्रत्येक बंडल मध्ये 100 नोटा अशा ऐकुन 30 लाख रुपये जप्त करून सखोल चौकशी सुरू केली असता या गुन्हयात आणखी तीन साथीदार असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे पोलिसांनी रामदास,
विजय व शेखर यांना ताब्यात घेऊन अटक करून चौकशीत त्यांनी दिलेल्या माहिती वरून भिवंडीतील सावद नाका येथून बनावट नोटा छापण्यासाठी वापर केलेला लॅपटॉप,
प्रिंटर,बनावट नोटांचे खऱ्या नोटांच्या मापात कटींग करण्यासाठी वापरलेले कटर, नोटा छापण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर व 15 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा इ.साहित्य जप्त केले असुन आता पर्यंत एकुण 45 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या ची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिक मेहनत घेतली, पुढील तपास सपोनि धनराज केदार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *