25 लिपिकांवर प्रभारी विभाग प्रमुख कार्यालयीन अधिक्षक पदाचा भार..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेत नियोजन पद्धतीने कारभार होत नसल्याने नागरी समस्या दिवसेनदिवस वाढत आहेत, त्यामुळे त्रस्त नागरिकांसह विविध पक्षाचे पदाधिकारी शासनाकडे लेखी निवेदन सादर करून तक्रारी करून महापालिका कारभारा कडे लक्ष द्यावे अशी विनंती करीत आहेत त्यामुळे महानगर पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी उपायुक्तासह प्रभाग अधिकारी वर्गाची बैठका व कामाचा आढावा घेत प्रशासनाची माहिती करून घेत प्रशासनाची घडी बसवण्यासाठी अनेक लिपिकांवर पुन्हा एकदा प्रभारी कार्यालयीन अधिक्षक व विभाग प्रमुख म्हणून पदभार सोपवला आहे.हे करीत असताना सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्त केलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांची त्या पदावरून पुन्हा कार्यालयीन अधिक्षक पदावर नियुक्ती करून सहाय्यक आयुक्तांची संख्या कमी केली आहे.त्यासोबत मुख्य अग्निशामक अधिकारी व मुख्य उद्यान अधीक्षक यांचे पद कमी करीत त्यांची सेवाज्येष्ठता डावलून विभाग प्रमुखांच्या रांगेत आणून ठेवले आहे.आयुक्तांचे आदेशानुसार करण्यात आलेल्या या तडकाफडकी बदल्यामुळे कर्मचाऱ्यां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिलिंद पळसुले,
सुधीर गुरव,सुदाम जाधव,अजित महाडिक,फैजल तातली यांची तत्कालीन आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवली होती.तर आता पर्यंत मुख्य अग्निशामक दल प्रमुख म्हणून असलेले राजेश पवार व मुख्य उद्यान अधीक्षक असलेले निलेश संख्ये यांच्या पदाची पदावनती करून या सर्वांवर कार्यालयीन अधिक्षक व विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.
प्रभारी कर्मचाऱ्यांची पदभार यादी
नितीन पाटील – प्रभारी सहाय्यक आयुक्त – सामान्य प्रशासन विभाग,
समन्वय अधिकारी, मंत्रालयीन कामकाज,
राजेश पवार – विभाग प्रमुख – अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख,
निलेश संखे – विभाग प्रमुख – उद्यान, वृक्ष प्राधिकरण व पर्यावरण विभाग
चंद्रशेखर चौधरी – वाहन विभागप्रमुख
सुधीर गुरव – कार्यालयीन अधिक्षक – कर मूल्यांकन व कर निर्धारण विभाग
जितेंद्र हेडाऊ – कार्यालयीन अधीक्षक प्रभाग समिती क्रमांक 3
उपेंद्र सांबारी – प्रभारी सहाय्यक प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग
मुजीब मस्तीम – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख भांडारगृह (बांधकाम,विद्युत )
फैसल तातली – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख आरोग्य व स्वच्छता विभाग
सोमनाथ सोष्टे – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक, तथा विभागप्रमुख पाणी पुरवठा विभाग
मिलींद पळसुले – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभाग प्रमुख क्रीडा व सांस्कृतिक विभाग व सुरक्षा विभाग
स्नेहल पुण्यार्थी – प्रभारी प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग
अजित मनोहर महाडिक – प्रभारी सहा. लेखाधिकारी व जनगणना व निवडणूक विभागप्रमुख (अतिरिक्त पदभार) लेखा विभाग व जनगणना व निवडणूक विभाग
श्रीमती सुरेखा पावडे – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख आस्थापना विभाग
राजेश गोसावी – प्रभारी वरिष्ठ लिपीक आस्थापना विभाग
श्रीमती कल्पाना तळपाडे – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख – भांडारगृह (आरोग्य) विभागश्रीमती दिप्ती बयास – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख – अभिलेख व साधनसामुग्री विभाग
मंदार जोशी – प्रभारी सिस्टम मॅनेजर तथा विभागप्रमुख – माहिती व तंत्रज्ञान विभाग
अनिल आव्हाड – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभाग प्रमुख – मालमत्ता, बाजार, परवाना व जाहिरात विभाग
दिपक बोपटे – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक – वाहन विभाग
प्रशांत संख्ये – फिटर कार्यशाळा
श्रीमती नेहाला मोमीन – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख – समाजकल्याण विभाग (महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, NULM, मागासवर्गीय कल्याण)
नितेश चौधरी – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख – बी. जी. पी. हॉस्पीटल
सुदाम जाधव – प्रभारी कार्यालयीन अधिक्षक तथा विभागप्रमुख – ग्रंथालय विभाग
श्रीमती किशोरी ठाकूर – प्रभारी मुख्याध्यापिका
चौकट
भिवंडी शहर महानगरपालिकेमध्ये सेवा जेष्ठता नुसार पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त अनमोल सागर यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे. मात्र पालिका प्रशासनाच्यावतीने सेवाजेष्ठता डावलून कर्मचाऱ्यांची नियुक्ती विविध पदावर केली जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी निर्माण होत आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास विभाग प्रधान सचिव यांना लेखी पत्र देणार असल्याची माहिती भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव श्रीपत तांबे,
अध्यक्ष भानुदास भसाळे यांनी दिली.
