भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील ठाणगे आळी बाजारपेठेत असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिराच्या इमारत मंदिर उभारणीचा शुभारंभ आमदार महेश चौगुले यांच्या शुभहस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आला.
याप्रसंगी महापालिकेचे माजी सभागृह नेते सुमित पाटील,नगरसेवक गजानन शेटे,प्रदिप राका,महेश जगताप, हभप गणेश पुलकंठवार,वास्तु विशारद सुशील सोमानी,समाज अध्यक्ष महेंद्र माडकर,भानुदास भसाळे,विश्वस्थ नंदकुमार वेल्हाळ यांच्यासह मान्यवर नागरिक महिला वर्ग व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत नामदेव महाराज हे कीर्तीवान संत होते त्यांचे मंदिर भिवंडीत आहे ही भूषणीय बाब आहे.

या समाजगृहाच्या उभारण्यासाठी आमदार महेश चौगुले यांनी वीस लाखाचा निधी जाहीर केला.असून नागरिकांनी सढळ हातानी मंदिर उभारण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आमदार महेश चौघुले यांनी केले.समाज बांधवांनी एकत्र येऊन कार्य केल्यास शहराचा विकास होत असतो आपली सांस्कृतिक टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र संघटित असणे आवश्यक आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे असलेले हे मंदिर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरो असे मनोगत भिवंडी पालिकेचे माजी सभागृह नेते सुमित पाटील यांनी यावेळी व्यक्त करीत 25 लाखाचा निधी जाहीर केला आहे.तर ह भ प गणेश महाराज पुलकंठवार यांनी संत नामदेव महाराज यांच्या माहिती विशद केली यावेळी ” जय नामदेव ” वेबसाईट सुरू करीत उद्घाटनही करण्यात आले.कार्यक्रम सुंत्रसंचालन शरद भसाळे तर आभार प्रदर्शन वैभव महाडीक यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व नागरिक वर्ग उपस्थित होते.
