भिवंडी ( प्रतिनिधी ) महीला दिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात गावातील मनीषा दीपक भोईर, मंथना वसंत पाटील या उद्योजक महिलांचा सन्मान सरपंच प्रियांका पाटील, माजी पंचायत समिती सभापती ललिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच चरणी पाडा या भागात स्टेम प्राधिकरणाकडून नव्याने पाईप लाईन टाकून पाणी योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सपना राजेंद्र भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी गावातील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतवतीने गावातील महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देऊन उद्योजक बनवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहेत. त्यासाठी बचत गटातील महिलांनी नुकताच प्रख्यात मसाला उद्योगास भेट दिली असून लवकरच गावात गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती उपसरपंच प्रताप पाटील यांनी दिली.गावातील बिडी कामगार गृहनिर्माण सोसायटी व चरणी पाडा या नागरी वस्तीत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आरो यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याचे संचालन गावातील महिला बचत गटाकडून करण्यात येणार आहे. येथे नाममात्र दरात नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती उपसरपंच प्रताप पाटील यांनी दिली.महिलादिनाचे औचित्य साधत चरणी पाडा या भागात स्टेम प्राधिकरणाकडून नव्याने पाईप लाईन टाकून पाणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी याप्रसंगी गावातील प्रमुख तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील, माजी सरपंच राजन मढवी,राजेंद्र भोईर,उपसरपंच प्रताप पाटील,माजी जिल्हा परिषद सभापती सपना भोईर,माजी सरपंच ज्योत्स्ना मढवी यांसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
