एमआयएम भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली…विरोधी गटात खळबळ माजली

भिवंडी



भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुस्लिम  मोठ्या संख्येने आहेत असे असताना त्यांचा विकासाचा विचार कोणत्याही राजकीय पक्षाने केला नाही.तर केवळ समाजवादाचा (सेक्युलॅरिझम) विचार समोर ठेऊन राजकीय पक्षांनी मुस्लिम वोट चा वापर करून घेतला आहे. मुसलमानां विकासात्मक भुमिकांच्या बाजूने बोलण्याची वेळ आली तेंव्हा राजकीय पक्ष नेत्यांनी गप्प बसण्याची भूमिका घेतली आता निवडणूक औचित्य साधून काहींनी राजकीय स्वार्थासाठी मुस्लिम विरोधी पक्षांना पाठिंबा दिला.त्यामुळे पुन्हा विकासात्मक मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे सर्वागीण विकासा
साठी एमआयएम
पक्ष नाही निवडणुकीचे रिंगणात उतरला आहे अशी माहिती भिवंडी एएमआयएमचे शहर जिल्हा कार्यध्यक्ष शादाब उस्मानी यांनी दिली. एमआयएम पक्ष अचानकपणे निवडणुकीचे रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सह विरोधी पक्ष गटात खळबळ माजली आहे.
   भिवंडीत  एमआयएम पक्षाचेवतीने  पत्रकार परिषद झाली. या प्रसंगी एएमआयएमचे उमेदवार खान मोह.अकरम आणि कार्यध्यक्ष शादाब उस्मानी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुस्लिम समाज शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या तीन समस्यांनी ग्रासलेला आहे.या सुविधा मिळविण्यासाठी मुस्लिम समाजाचे स्वतःचे नेतृत्व पाहिजे म्हणून मुस्लिम समाजासाठी मुस्लिम उमेदवार पक्षाने 
उभा केला आहे. शहरातील इंदिरागांधी उप-जिल्हा रुग्णालयास जिल्हा रुग्णालय बनवावे,
शहरात राज्याबाहेरील नागरिकांसाठी रेल्वेसेवा सुरु करावी,यंत्रमाग उद्योगासाठी वीजदर कमी करावे आणि टोरेंट पॉवर कंपनीची फ्रॅन्चायसी रद्द करावी. भिवंडी शहर-ग्रामीण मध्ये आमचे मतदार आहेत त्याप्रमाणे लोकसभा मतदार संघात देखील आमचे मतदार आहेत. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आहोत. या मतदार संघात ५ लाखापेक्षा जास्त मुस्लिम व पीडित जातीचे लोक आहेत. त्यांच्या मतांवर आम्ही ही निवडणूक लढवीत असुन आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *