भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील भोईवाडा परिसरातील गंगाराम वाडी येथील “कोहिनूर इमारत (बी-विंग) इमारत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळून
झालेल्या भीषण दुर्घटनेत दहा (10 ) निष्पाप
नागरिकांचा मृत्यू झाला असून तर तीन जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी इमारत मालक व ठेकेदारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. असे असलेतरी या दुर्घटनेला महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग उपायुक्त जबाबदार असून राज्य शासन व भिवंडी पोलीस उपाआयुक्त डॉ. पवन बनसोड यांनी याबाबत तातडीने सखोल चौकशी करून बेजाबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबन व बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते शेख खालिद गुड्डू यांनी केली आहे
भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहे त्याचबरोबर अति धोकादायक व धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे याबाबत नागरिकांनी सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त व संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत त्यामुळे त्यांनी संबंधित इमारतींना धोकादायक ठरवून नोटीसा दिले आहेत मात्र कारवाई कोणत्याही प्रकारची केली नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे असे असतानाच शहरातील भोईवाडा परिसरात असलेली कोहिनूर ही चार मजली इमारतीस महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक घोषित करून इमारत
रिकामी करण्यासाठी नोटिस बजावली होती.मात्र त्यानंतर त्याकडे महापालिका प्रशासन व प्रभाग अधिकारी यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे संबंधित इमारत मालक व इमारत दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांने प्रभाग समिती व महापालिका आयुक्त प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता इमारतीचे व तळमजल्यावरील (पिलर)खांबांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असे असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली तक्रार पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता खालिद गुड्डू शेख यांनी यांनी पोलीस उपाआयुक्त डॉ. पवन बनसोड व राज्य शासनाकडे केली आहे. झालेली दुर्घटना नैसर्गिक नसून प्रशासकीय निष्काळजीपणा आणि गंभीर हलगर्जीपणाचा परिणाम आहे असल्याची लेखी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.मनपा आयुक्त अनमोल सागर व संबंधित विभागाचे अधिकारी या घटनेला जबाबदार असुन सदर दुर्घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व बडतर्फ करण्याची मागणी शेख खालिद गुड्डू यांनी केली आहे.मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी 18 जून 2026 रोजी शहरातील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या तातडीने रिकाम्या करून घेण्याचे लेखी आदेश उपायुक्त व प्रभाग अधिकारी यांना दिले होते. मग त्या आदेशांची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संबंधित केवळ निष्काळजीपणा नसून गंभीर प्रशासकीय अधिकाऱ्यांची अपयशाची बाब आहे.त्यामुळे शासनाने
तात्काळ या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबित बडतर्फ कारवाई करण्याची मागणी केली.तसेच शासनाने त्यांच्या विरोधात
भारतीय न्याय संहिता, 2023 मधील संबंधित कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.
चौकट
भिवंडीतील झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे नगरसेवक, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.प्रशासनाने तातडीने आणि कठोर कारवाई केली नाही, तर नागरिक शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून
आपली नाराजी व्यक्त करतील असे मत शेख खालिद गुड्डू यांनी व्यक्त केले आहे. भिवंडीतील नारपोली पटेल कंपाऊंड येथे 21 सप्टेंबर 2020 रोजी जिलानी इमारत कोसळून 38 हून निरपराध रहिवासी नागरिकांचा मृत्यू झाला होता,
त्या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने
सुमोटो पीआयएल(Suo Motu PIL) क्रमांक 1/2020 दाखल केला होता,ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. इतक्या वर्षांनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याची खंत खालिद गुड्डू यांनी व्यक्त केली असुन पोलीस उपाआयुक्त,
मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खालिद गुड्डू शेख यांनी दिला आहे.

