इमारत दुर्घटनेमुळे भिवंडी महापौर संतप्त,अधिकाऱ्यासह आपत्ती व्यवस्थापनाची घेतली आढावा बैठक

भिवंडी

.

कामात कसूर केल्यास प्रशासकीय कारवाई चा दिला इशारा…

भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी शहरातील मनपा प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या भोईवाडा गंगाराम वाडी येथे
गुरूवारी मध्यरात्री झालेल्या इमारत
दुर्घटनेमुळे महापौर नारायण चौधरी हे व्यथित व पालिका अधिकारी प्रशासनावर संतप्त झाले असुन झालेल्या दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापौर नारायण चौधरी यांनी तातडीने आज दुपारी महापालिका उपायुक्त व प्रभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त व विविध प्रमुख अधिकाऱ्याची विशेष बैठक घेऊन महापालिकेच्या विविध विभागात सुरू असलेल्या अक्षम्य व गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला

. झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी व्यक्तित होऊन नाराजी व्यक्त केली. शासन व महापालिका महापौर, लोकप्रतिनिधी आणि आयुक्त प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे व निर्देशाचे सर्व अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे अन्यथा यापुढे संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा महापौर चौधरी यांनी यावेळी दिला.
महापालिका सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीस उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी संदिप गाडेकर, सहायक आयुक्त नितीन पाटील,
फैसल तातली,प्रभाग समीती 1 अधिकारी समीर जवरे, प्रभाग समिती क्र. 2 विनोद मनोरे, प्रभाग समिती क्र. 3 नितेश चौधरी,प्रभाग समिती क्र.4 अरविंद घुगरे, प्रभाग समिती क्र. 5 गिरीष घोष्टेकर, अग्निशमन अधिकारी नितीन चव्हाण, सुरक्षा विभाग प्रमुख सुदाम जाधव,वाहन विभाग प्रमुख शेखर चौधरी, फरहान नाचण,
आस्थापना विभाग प्रमुख श्रीमती कल्याणी चन्ने, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शाकीब खर्बे,विधी अधिकारी अँड अनिल प्रधान अदि अधिकारी उपस्थित होते.महापौर चौधरी यांनी इमारत दुर्घटनेचा आढावा घेऊन बाधित नागरिकांना रहिवाशांची निवासाची व भोजन व्यवस्थेचादेखील आढावा घेत सहकार्य करण्याचे आदेश प्रशासनाला दिले तसेच शहरातील सर्व धोकादायक व
अतिधोकादाय इमारतींचा आढावा घेत नोटीस बजावण्यात आलेल्या इमारती चे तात्काळ सव्है करून माहिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
उपायुक्त विक्रम दराडे यांनी शहरातील सर्व धोकादायक व अतिधोकादाय इमारतींची माहिती सादर केली त्यामुळे आपत्ती
व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापौर चौधरी यांनी पालिका प्रशासन
अधिकाऱ्यांनी गटनिहाय C1 प्रवर्गातील 238 व C2 A प्रवर्गातील 836 इमारतींचे नळ व वीज पुरवठा खंडीत करुन त्या तात्काळ निर्मनुष्य करण्याची कार्यवाही करावी तसेच धोकादायक व अति धोकादायक इमारतीनां नोटीस बजावताना जागामालक, भोगवटदार यांना पंचनाम्याची प्रत तात्काळ देण्यात यावी. धोकादायक व अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करावयाचे झाल्यास महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये 5-6 दिवसांकरिता तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करावे.
धोकादायक व अति धोकादायक इमारतीचे निष्कासन करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करताना सदर पत्रामध्ये कलम 268 चा उल्लेख करुन पोलीस बंदोबस्ताची मागणी करावी अशी महत्त्वपूर्ण सूचना महापौर चौधरी यांनी यावेळी उपायुक्तांना दिली तसेच धोकादायक व अति धोकादायक इमारतींचा वीज पुरवठा खंडीत करण्याची पुर्णत: जबाबदारी ही टोंरेंट पॉवर कंपनीची असेल, मात्र प्रभाग अधिकाऱ्यांनी विहीत वेळेत त्यांना पत्राद्वारे कळविण्याची दक्षता घ्यावी. धोकादायक व अति धोकादायक घोषित केलेल्या इमारतींच्या ठिकाणी विनापरवानगी दुरूस्तीचे काम सुरू नाही ना याची खात्री करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तसेच रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी समक्ष जाऊन पहाणी करावी याबाबत कसुरी केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा महापौर नारायण चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिला
चौक
आवश्यकतेनुसार प्रभाग निहाय मोठे डंपर व जेसीबी भाड्याने उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही वाहन विभागाने करावी. प्रभाग अधिकाऱ्यांना नविन बोलेरो जीप वाहने उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव वाहन विभागाने सादर करावा. अग्निशमन विभागाच्या वाहनांची वेळोवेळी निगा दुरूस्ती करण्यात यावी. वैद्यकीय आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. आपत्कालीन परिस्थीतीकरिता एक रुग्णवाहिका भाड्याने घेऊन ती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सुपूर्द करावी. प्रभाग कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे रोड कामगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आस्थापना विभागाची राहील अशी माहिती त्यांनी दिली. पावसाळा सुरू असून शहरात कोठेही दुर्घटना होणार नाही याबाबत महापालिकेच्या अधिकारी व प्रभाग अधिकाऱ्यांनी घ्यावी कामांमध्ये कोणत्याही प्रकारची कसुरी करू नये अन्यथा त्यांच्यावर मनपा प्रशासकीय कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशाराही महापौर चौधरी यांनी यावेळी दिला.