भिवंडीचे विभाजन करून ” पडघा ” गावाला स्वतंत्र तालुका म्हणून घोषित करण्याची ग्रामस्थांची मागणी

भिवंडी


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष घालण्याची केली विनंती..

भिवंडी (प्रतिनिधी ) : ठाणे जिल्ह्यातील एकमेव मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी तालुक्याचे विभाजन करून ” पडघा ” या गावाला राज्य शासनाने स्वतंत्रपणे तालुका स्तराचा दर्जा जाहीर करून पडघा व परिसरातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास करावा आणि तेथे तालूका महसूल मुख्यालय स्थापन करावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पडघा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डॉ संजय पाटील व स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि आमदार, खासदार यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भविष्याचे दृष्टिकोनातून काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाच्या ११ जून २०२६च्या पत्रानुसार महसूल व वन विभागाच्या सह सचिवांकडून नवीन कार्यालयाचे मुख्यालय व अप्पर तालुका निर्मिती बाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून त्यावर नागरीकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. या अधिसूचनानुसार भिवंडी तालुक्यातील ” पडघा गाव ” हे अप्पर तालुका मुख्यालय करण्यासाठी हरकती मागविण्यात आल्या आहेत. यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाल्यास पडघा व ग्रामीण भागाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे अशी माहिती डॉ. संजय पाटील यांनी दिली.त्यामुळे पडघा या गावाला स्वतंत्रपणे तालुका स्तराचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी डॉ. पाटील व स्थानिक ग्रामस्थां कडून शासनाकडे होत आहे.
भविष्यात होणारा विकास पाहता भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण जनतेच्या सोईच्या दृष्टीने पडघा तालुका होणे क्रमपात्र आहे. भिवंडी तालुक्याच्या भौगोलिक दृष्ट्या विचार केला असता ग्रामीण कपडा,
भाजीपाला आणि सुकी मच्छी याची पडघा हि मुख्य बाजारपेठ असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.तसेच
पडघा शहराला मुंबई – समृद्धी मार्ग, मुंबई अहमदाबाद हायवे मुंबई – नाशिक महामार्ग पडघा गावतून जवळचा असल्याने दळणवळण दृष्टीने सोयीचे ठिकाण झाले आहे. त्याचबरोबर पडघा शहरापासून खडवली रेल्वे स्टेशन ५ की.मी. व वासिंद रेल्वेस्टेशन १० कि.मी. अंतरावर आहे. त्याचप्रमाणे पडघा हे पोलीस स्टेशन मुख्यालयाच्या हद्दीत ५०/६० गावांचा समावेश आहे.पडघा परिसरात गोडाऊन झोन आल्याने मोठ्या प्रमाणात वाढते नागरीकरण होत आहे.” पडघा ” तालुका निर्मितीसाठी हि लोकसंख्या पुरेशी असुन लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे.
——–चौकट———
सध्या ” पडघा ” गावास सध्या १.५ एमएलटी लिटरची पाण्याची टाकी आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता 10 एमएलटी अधिक पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ आणि राजकीय पक्षाचे नेते पुढाकार घेत आहेत. तसेच ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर प्लांट होणार आहे,अशी माहिती पडघा ग्रामपंचातीचे माजी सदस्य डॉ.संजय पाटील यांनी दिली.
” पडघा तालुका ” जाहीर झाल्यास भातसा कॉलनीजवळ ७ एकर जागेत शासकीय कार्यालये बांधणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे पडघा गावा जवळ ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय प्रस्तावित आहे.तसेच पडघा परिसरात परिवहन विभागाचे मुख्य कार्यालय देखील प्रस्तावित आहे.तसेच पडघा परिसरात ठाणे जिल्हा कारागृहाची निर्मिती होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रस्तावित आहे.
पडघा तालुका झाल्यास नागरिक प्रश्न व शासन प्रलंबित योजना राबविण्यात सुलभ होईल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
पडघा गावामधून समृद्धी महामार्ग व मुंबई नाशिक या मार्गासह इतर महामार्ग गावाजवळून जात असल्याने भविष्यात अपघाती रुग्णांना त्वरित उपचार होण्याच्या सोयीने पडघा येथे उपजिल्हा
रूग्णालयात निर्मिती होणे आवश्यक आहे, त्यासाठी
प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी इमारत आहे. या इमारतीमध्ये उपजिल्हा रुग्णालय केल्यास त्याचा लाभ तालुक्यातील 50 हजारांहून अधिक नागरिकांना होणार आहे.
—–चौकट———
पडघा तालुका झाल्यास शिक्षणाच्या निमित्ताने शाळा,विद्यालय आणि महाविद्यालय देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत होऊ शकते.त्यामुळे राज्य शासनाने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पडघा तालुक्यासाठी मंजुरी द्यावी,अशी मागणी विनंती पडघा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डॉ संजय पाटील,
श्रीकांत गायकर,
काशीनाथ शेलार, वंसत पाटील,भानुदास तांबोळी, विलास पाटील, भगवान सांबरे,अशोक शेरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रेय पाटोळे, अविनाश म्हात्रे, शांताराम पाटील, मोहन शेलार, दीलशाद शेख, सुचीत जाधव,संजय पटेल, रुपेश कुडुसकर, सागर पारधी,
सत्यवान जाधव, संदीप गायकवाड यांच्या सह परिसरातील ग्रामपंचाय सदस्य, नागरिक,राजकीय पक्षांचे पदाधिकारी ग्रामस्थ यांनी शासनाकडे केली असून पडघा तालुका व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.