काँग्रेस उमेदवार दयानंद चोरघे यांच्या प्रचारासाठी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन भिवंडीतील रस्त्यावर उतरले..

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार दयानंद चोरघे यांचा प्रचार जोमामध्ये सुरू असून काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वखाली पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार सभेमध्ये व पदयात्रा मध्ये सहभागी होत आहेत,आज रविवारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार व भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल बाईक रँली काढण्यात आली, यावेळी कार्यकर्तेनी जोरदार घोषणाबाजी करत विविध भागात फिरून मतदारांशी संवाद साधण्यात आला. हजारोच्या कार्यकर्ते संख्येने सहभागी झाले होते.


       भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार उमेदवार महेश चौघुले,काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दयानंद चोरघे, समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आझमी,माजी महापौर अपक्ष उमेदवार विलास पाटील, एमआयएमपक्षाचे वारीस पठाण यांच्यासह काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोमामध्ये सुरू असून ठीक ठिकाणी प्रचार 
सभा होत आहेत,
काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार दयानंद चोरघे यांचा प्रचार करण्यासाठी माजी आमदार शहराध्यक्ष रशिद ताहीर मोमीन यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार जनसंपर्क
संवाद करून काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्यासाठी आवाहन करीत आहेत. ठिकठिकाणी पक्षाचे तात्पुरती कार्यालय उघडली आहेत. आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार दयानंद चोरघे यांचा प्रचार करण्यासाठी माजी खासदार क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी हजेरी लावली भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरातील धोबी तलाव स्टेडियम येथे मोहम्मद अझरुद्दीन यांचे भव्य स्वागत करून त्यांच्या उपस्थितीत धामणकर नाका,वंजारपट्टी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाजारपेठ अशा विविध भागातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य  बाईक रॅली काढण्यात आली होती भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भव्य बाईक रँली रोड शो मध्ये हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भिवंडीच्या सर्वांगीण विकासा
साठी चोरगे यांना विजयी करावे असे आवाहन यावेळी अझरद्दिन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *