भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत भिवंडीत वाजतगाजत काढण्यात आली भव्य मिरवणूक

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव निमित्त भिवंडी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.हजारो भिम सैनिकांसह महिला-नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत सहभागी होते.डॉ बाबासाहेबच्या प्रतिमेला हिंदु मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी फुलांचे पाकळ्या अर्पण करून अभिवादन केले.
अनुचित प्रकार घडु नये यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैणात केला होता.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचेवतीने धामणकर नाका येथून या मिरवणुकीस  प्रारंभ झाला.ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, केंद्रीय मंत्री कपिल पाटीलआमदार महेश चौगुले,सभागृह नेते सुमित पाटील ,पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी,Aap सचिन सांगळे, दिपक देशमुख,उत्सव समितीचे विकास निकम,सुमित्र कांबळे,युवा नेते विशाल पाठारे,अदि मान्यवरांनी महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विद्युतमाळा व फुलांनी सजविलेल्या ट्रक,टेम्पो,रथा मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेऊन ढोल ताशा वाजंत्री,डिजे चे तालावर नुत्ये करत भिम सैनिक व महिला जल्लोष करत होते.लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मतदान करा,पाणी बचत,शैक्षणिक जन जागरण,स्वच्छता अशा विविध विषयावर फलक या मिरवणुकीत लावण्यात आले होते.सदर प्रभुआळी मंडई येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील भोईर व इतर सामाजिक संस्थेच्यावतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. कणेरी,गौरीपाडा, रोशनबाग, प्रभुआळी मंडई,नवीचाळ,तीनबत्ती,कोटरगेट मशिद मार्गे ही मिरवणूक
भिवंडी महापालिके समोर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळया जवळ चौकात रात्री 12:45 वा. संपन्न झाली.या वेळी महामानवास सामुहिकरित्या आदरांजली वाहण्यात आली.जयंती उत्सव निमित्त विविध मंडळांनी डॉ. आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित आकर्षक देखावे शहरात उभारले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *