भिवंडी ठाणे महामार्गावर  वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी त्रस्त

भिवंडी



वाहन कोंंडी न सोडविल्यास आंदोलन करणार – देवानंद थळे

गोदाम ट्रान्सपोर्ट चालक मालकांची बैठक घेण्याची मागणी

भिवंडी ( प्रतिनिधी ) मुंबई – नाशिक भिवंडी बायपास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बहुतांश व्यापारी नागरिक हे भिवंडी – ठाणे या जुन्या महामार्गावरून ठाणे व मुंबईकडे जाण्यासाठी आपली वाहने घेऊन जात आहेत मात्र या महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रक, कंटेनर व अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत असल्यामुळे 18 कि.मी.अंतर असलेल्या ठाणे कडे जाण्यासाठी.2 तास तर मुंबई साठी 4 तास खर्ची घालावे लागत आहेत.या वाहतूक कोंडी मुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांचे हाल होत आहेत वाहतूक पोलीस प्रशासनाने तातडीने याप्रकरणी लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख माजी नगरसेवक देवानंद थळे यांनी केली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रान्सपोर्ट चालक – मालक,गोदाम धारकांची स्थानिक ग्रामस्थांसोबत विशेष बैठक पोलीस
आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी ही थळे यांनी केली आहे।


    गेल्या दोन महिन्या पासून भिवंडी – ठाणे या जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या मार्गावरून जाणारे शालेय विद्यार्थी, सह प्रवासी नागरिक त्रस्त झालेली आहेत.
शहरातील अंजुर फाटा चौक ते राहणाळ,पूर्णा,कोपर व काल्हेर,कशेळी या मार्गावर ट्रान्सपोर्ट मालाची साठवणूक करणारी गोदाम आहेत.या गोदामा मध्ये राजस्थान,
गुजरात, सुरत,
हैदराबाद, मद्रास,
बँगलोर सह मुंबई,नागपूर,पुणे,
नाशिक,औरंगाबाद अशा विविध शहरातून माल विविध प्रकारचा माल ट्रक,टेंपो सह कंटेनर व इतर वाहणातून ने आण केला जात आहे.
रस्त्याचे दोन्ही बाजूला ही गोदाम असल्याने सदरचा माल ने आण करताना अनेक वाहन चालक हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.तसेच या मार्गावर होलीमेरी हायस्कूल,चौघुले महाविद्यालय,
परशराम टावरे विद्यालय,माधवराव पाटील बाल विद्यालय अन्य शाळा आहेत दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत येजा करीत असतात वाहतूक कोंडी मुळे त्यांना सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशी तक्रार देवानंद थळे यांनी केली आहे.
वाहन कोंडी ला कंटाळून दोन दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा केले होते मात्र आजही वाहतूक कोंडी कायम आहे.
भिवंडी – ठाणे या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी तातडीने सोडवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी,
वाहतूक पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ, ट्रान्सपोर्ट मालक व चालक,गोदामधारकांची बैठक घेऊन वाहतुकी बाबतीत नियोजन करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केली असून याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *