भिवंडीत पालिकेच्यावतीने लोकसभा निवडणुक मतदानासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजन

भिवंडी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) आगामी होणाऱ्या 2024 सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगर पालिकेच्यावतीने मतदार जनजागृती अभियान सुरू केले असून शहरातील मतदारांनी आगामी लोकसभा निवडणूकीत निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचे बळकटीकरण करावे, असे आवाहन भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.


अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे, उपायुक्त दीपक झिंजाड, सहाय्यक आयुक्त निवडणूक विभाग नितीन पाटील,प्रभाग अधिकारी सुधीर गुरव  यांच्यासह प्रभाग अधिकारी व कर्मचारी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत भिवंडी महापालिका,बी.एन.एन. महाविद्यालय,नेहरू युवा केंन्द्र, आधार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मतदार जनजागृती अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच पालिका कार्यक्षेत्रातील माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयात निबंध स्पर्धा, आई-बाबांना पत्र लेखन, तसेच निवडणूक साक्षरता मंच यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गत लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शहरातील ज्या भागांत मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे,अशा परिसरांना पालिका अधिकारी व कर्मचारी गृहभेटी बैठकीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.आगामी काळात महिला मतदार,दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार,तृतीयपंथी मतदार, देहविक्रय करणाऱ्या महिला मतदार,भटके विमुक्त मतदार, यंत्रमाग कामगार मतदार इत्यादी वंचित घटकांचा निवडणूकीत सहभाग वाढविण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा महापालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी दिली ,छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सहेली जायंटस् ग्रुप ऑफ भिवंडी,जी.एम.मोमीन महिला महाविद्यालय व भिवंडी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मतदार जनजागृतीपर पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले.आयोजित कार्यक्रमात महिला व शालेय विद्यार्थी सह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *