माझी वर्दी, माझा मताधिकार पोलीस अधिकारी- कर्मचारी  कुटुंबियां साठी
नवीन मतदार नोंदणी शिबीर संपन्न

भिवंडी



ठाणे – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत व सेवा निवृत्त जवान,अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याकरिता “माझी वर्दी, माझा मताधिकार”  या अभियानांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस आयुक्त ठाणे व १४८ ठाणे विधानसभा मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ मार्च २०२४ रोजी सिध्दी हॉल येथे हे शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमात कर्मचारी अधिकाऱ्यांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या शिबिरामध्ये तहसिलदार आसावरी संसारे, नायब तहसिलदार स्मितल यादव, नायब तहसिलदार नीलिमा मोहिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आगामी निवडणूकीमध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन केले. तसेच यावेळी उपस्थिताच्या शंकांचेही निरसन करण्यात आले.
या शिबिरामध्ये ठाणे जिल्ह्यातील पोलिसांचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अर्ज BLO चंद्रिका पालन यांनी Voter Helpline App वर भरून देण्यास सहकार्य केले. या शिबिराच्या आयोजनामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयातील समाज कल्याण विभागाचे दिलीप माळवे यांनी सहकार्य केले. याशिबिरामध्ये सुमारे १४०पोलिसांनी सहभाग घेतला, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *