भिवंडी ( भानुदास भसाळे )पोलिसांविषयी
निर्माण झालेले गैरसमज दूर होऊन पोलिस आणि जनता यांच्यातील संवाद वाढून विश्वास अधिक मजबूत व्हावा. तसेच पोलिसांचे कामकाज कसे चालते हे महाविद्यालयात
” लाँ ” चे शिक्षण घेणारे विद्यार्थी, युवावर्ग व सर्व सामान्य नागरिकांना कळावे.तसेच, जनतेला पोलिसांशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीतील विविध पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या ” व्हिजिट माय पोलीस स्टेशन ” या अभिनव उपक्रमास भिवंडीत आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत समाधान केले.

भिवंडी शहरातील पोलीस उपाआयुक्त कार्यालय कार्यक्षेत्रातील निजामपूरा,शहर,कोनगांव, नारपोली,
भोईवाडा,शांतीनगर अशा विविध पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ” व्हिजिट माय पोलीस स्टेशन ” हा उपक्रम राबविण्यात आला.पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे यांच्या उपस्थितीत सकाळी सुरू झालेल्या उपक्रम प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, कृष्णदेव खराडे विजय कदबाने,
नेताराम मस्के विनायक गायकवाड,
विक्रम मोहिते अदि वरिष्ठ पोलीस निरीक्षक व महाविद्यालयीन कायदयाविषयी शिक्षण घेणारे विद्यार्थी,भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियनचे अध्यक्ष भानुदास भसाळे, सचिव श्रीपत तांबे,शांतता समीती सदस्य जेष्ठ पत्रकार शरद भसाळे,लतीफ बाबा,वैशाली मेस्त्री, इरफान पटेल,डॉ. राजेश दहापुते,
महिला- नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिवंडीत
व्हिजिट माय पोलिस स्टेशन ‘ हा उपक्रम राबवण्यात आला. सर्वसामान्य नागरिक,विद्यार्थी, युवावर्ग यांच्या मनात पोलिसांच्या कामकाज बद्दल काही प्रमाणात असते. ही भीती नाहीशी व्हावी. पोलिस जनतेचे मित्र आहेत, अशा प्रकारची भावना निर्माण होण्यासाठी या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे यांच्या कडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळणार आहे.जेष्ठ नागरिक व जनतेच्या सुविधांसाठी शासन निर्देशानुसार विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असुन त्यांच्या
अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.पोलिस ठाण्यात आलेल्या महिला, नागरिक,
बालकांना कशा पद्धतीने मदत केली जाते याची सुध्दा यावेळी उपस्थित नागरिकांना देण्यात आली.लोकांमध्ये पोलिसांविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

