कामतघर ताडाळी रस्ता वाहन कोंडीतून मोकळा झाला…
भिवंडी (शरद भसाळे)
भिवंडी शहरातील कामतघर ताडाळी या अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर दुकानदारांनी पदपथ व्यापला आहेत, तसेच रस्त्यावरील
मोकळ्या जागेत हातगाड्या व फेरीवाल्यानी अतिक्रमण करून संपूर्ण रस्ता
व्यापला असल्याने या मार्गावर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पादचारी नागरिकांसह वाहन चालकांना या रस्त्याने जात असताना प्रचंड वाहतूक कोंडी चा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती,तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहन पार्क केली जात असल्याने रस्ता अरुंद होत गेला त्यामुळे बाजारात खरेदी साठी आलेल्या महिला व नागरिकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी याबाबत स्थानिक नागरिकांनी भिवंडी पालिकेचे महापौर नारायण चौधरी यांना याबाबत तक्रार केली असता त्यांनी
स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील
वाहतूक पोलीस पथकासह कामतघर ते ताडाळी या मार्गाची पाहणी करून पोलिसांना व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ मिळाली आहे


शहर परिसरात व कामतघर ताडाळी भागात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबतीत महापौर
नारायण चौधरी,पोलिस प्रशासन व वाहतूक पोलिस शाखा यांना लेखी पत्रव्यवहार करून कडक कारवाईची मागणी केली.महापौर चौधरी वाहतूक कोंडी बाबतीत स्वतः रस्त्यावर उतरल्यानंतर नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती, यावेळी महापौर चौधरी यांनी रस्त्यावर अतिक्रमण
करणारे फेरीवाले, हातगाडी व्यवसायिक आणि सर्व दुकानदारांना ताकीद देत कामतघर परिसरातील रस्ता मोकळा करून दिला आहे.पालिका करणार असलेल्या या कारवाईचा धसका घेऊन सकाळ पासूनच दुकानदारांनी आपल्या दुकाना समोरील पदपथावरील साहित्य उचलून ते मोकळे केले होते.महापौर यांचा रौद्ररूप पाहून हातगाड्या तेथून गायब झाल्या होते.यावेळी महापौर नारायण चौधरी यांच्या सोबत नगरसेवक कमलाकर पाटील,
पालिकेचे सहाय्यक आयुक्त नितेश चौधरी, नारपोली व शहर पोलिस तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दुकानदार आपल्या दुकाना बाहेरील पदपथावर साहित्य ठेवताता तर दुकानासमोर हातगाडी लावणाऱ्यां कडून प्रतिदिन १०० ते २०० रुपये भाडे घेऊन रस्ता गिळंकृत करीत असल्याचे तक्रारी आहेत,त्यामुळे या रस्त्यावर सकाळी व सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होते.अंजूरफाटा कशेळी रस्त्यावर व बायपास रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी असल्याने स्थानिकांसोबतच अनेक शहरवासीय ठाणे मुंबई कडे जाण्यासाठी सोयीस्कर म्हणून कामतघर ताडाळी या रस्त्याचा वापर करतात. पण येथे होणारू वाहतूक कोंडी ही अतिक्रमणामुळे होत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याची भूमिका नगरसेवक कमलाकर पाटील यांनी यावेळी मांडली, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नाहक सर्वांना त्रास होत असल्याने यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक करावी केली जाईल असा इशारा महापौर नारायण चौधरी यांनी दिला आहे.

