भिवंडीत परिवहन सेवा सुरू करण्याची महापौर नारायण चौधरी यांनी केली घोषणा..
भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी ग्रामीण व शहर परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी रिमझिम पाऊस असताना सुध्दा भिवंडी महानगर पालिका,
उपविभागीय अधिकारी कार्यालय,न्यायालय, तहसीलदार कार्यालय,
पोलीस उपाआयुक्त, कार्यालय,तसेच महाविद्यालय,शाळा,राजकीय पक्ष कार्यालय,
पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी ध्वज रोहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शालेय विद्यार्थीसह महिला व नागरिकांनी उस्फूर्तपणे उपस्थित होते,

भिवंडी महानगर पालिकेच्या प्रांगणात महापौर नारायण रतन चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रसंगी आयुक्त अनमोल सागर उपमहापौर तारीक अब्दुल बारी मोमीन,स्थायी समिती सभापती ॲड. इशा मिस्बाह इमरान खान,अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त विक्रम दराडे,श्रीमती
सपना वसावा,उपायुक्त बाळकृष्ण क्षिरसागर,
सहाय्यक आयुक्त गिरीष घोष्टेकर,सुदाम जाधव,
किरण गायकवाड,संदीप पटनावर,नफीस मोमीन,डॉ.संदीप गाडेकर, डॉ. जयवंत धूळे,सचिन नाईक, जमील पटेल, हरेष म्हात्रे, विनोद मते,एजाज घोरी,फरहान नाचन,
पालिकेचे नगरसेवक,
सभापती, अधिकारी व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

शहरातील नागरिकांसाठी लवकरच इलेक्ट्रीक बस सेवा सुरू करणार असल्याची माहिती महापौर नारायण चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना दिली. नागरीकांना स्वस्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमुद केले. तसेच, महिला सक्षमीकरणांतर्गत 500 महिलांना प्रशिक्षण देण्यात उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महापौर चौधरी यांनी सांगितले., महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय संसद व राष्ट्रपती भवनाच्या कामकाजाची माहिती मिळावी या उद्देशाने दिल्ली येथे एका शैक्षणीक सहलीचे आयोजन करणार असल्याची माहिती महापौर नारायण चौधरी यांनी दिली,युवा तरूण वर्गाने व्यसानांपासून दूर राहुन निरोगी आरोग्याचा स्विकार करावा, तसेच शहराच्या विकासात योगदान दयावे असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील सर्व नागरीकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करुन शहर स्वच्छतेमध्ये योगदान देण्याचे आवाहन देखील महापौर चौधरी यांनी यावेळी केले,
चौकट
प्रांत कार्यालय व बाल सुधारगृह येथे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष अँड.प्रमोद पाटील, सचिव दिलीप कलंत्री,अशोक फडतरे व सदस्य अदि उपस्थित होते.पोलीस उपायुक्त कार्यालय डीसीपी डॉ. पवन बनसोड,तहसील कार्यालय तहसीलदार अभिजित खोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्वतंत्र दिनाच्या महोत्सवानिमित्त विविध पोलीस स्टेशन महापालिका कार्यालय यांना तिरंगा विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले होते.
यंदा स्वातंत्र्य दिन महोत्सव निमित्त
हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत घर,इमारत,
दुकानावर तिरंगा ध्वज लावून नागरिकांनी स्वातंत्र्य उत्सवाचा आनंद साजरा केला.

