भिवंडी पालिकेत शासन आदेशानुसार पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची नियुक्ती..

भिवंडी

वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे डॉ. संदीप गाडेकर

भिवंडी ( प्रतिनिधी )
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत गर्भधारणा पूर्व व प्रसव पूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम, २००३ (PCPNDT Act) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सन २०२६–२७ करिता शासन आदेशानुसार पीसीपीएनडीटी
सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती भिवंडी मनपाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गाडेकर यांच्या कार्यरत राहणार असून नोडल अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांच्या समन्वयाने
सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. राजेश दहापुते यांच्या अध्यक्षतेखाली
समितीच्या कामकाजाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या संस्थांनी शासन व मनपा आदेशानुसार कायद्याचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल अशी माहिती डॉ.गाडेकर यांनी यावेळी दिली.
शहरातील डॉ. राजेश दहापुते, डॉ.निलेश टावरे,डॉ.शेखर जोशी,
अँड. समिर चंद्रकांत पवार,डॉ.रुपल शहा,शरद वसंत भसाळे,राजेश शिवराम शेलार,जनसंपर्क अधिकारी अदि मान्यवर या सल्लागार समितीचे सदस्य असणार आहेत. समितीची प्रमुख उद्दिष्ट
पीसीपीएनडीटी कायद्याच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे, सोनोग्राफी केंद्रांचे नियमन व निरीक्षण करणे तसेच गर्भातील लिंगनिदान व लिंग निवडीस प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती डॉ. संदीप गाडेकर, डॉ.जयवंत धूळे, डॉ. राजेश दहापुते यांनी दिली.पीसीपीएनडीटी कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे.
सोनोग्राफी व संबंधित केंद्रांची आवश्यक कागदपत्रे व नोंदींची तपासणी करणे.केंद्रांच्या कामकाजाचे नियमानुसार निरीक्षण व मार्गदर्शन करणे.कायद्याचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार आवश्यक कार्यवाहीसाठी अहवाल सादर करणे.गर्भलिंग निवड व गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे ही प्रमुख भूमिका असणार आहे अशी माहिती डॉ.गाडेकर यांनी दिली.
संबंधित वैद्यकीय व्यावसायिक व संस्थांना कायद्याच्या तरतुदीं बाबत मार्गदर्शन करणे.
पीसीपीएनडीटी संदर्भातील तक्रारी व प्रकरणांचा नियमानुसार आढावा घेणे.
मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे व “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या उद्देशाला चालना देण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविणे.पालिका आयुक्तप्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संदीप गाडेकर, नोडल अधिकारी डॉ.जयवंत धुळे यांच्या समन्वयाने समिती प्रभावीपणे कार्य करणार असल्याची माहिती डॉ. दहापुते यांनी दिली.
पीसीपीएनडीटी
कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक संबंधित वैद्यकीय संस्था व व्यावसायिकाची कायदेशीर तसेच सामाजिक जबाबदारी आहे.गर्भलिंग निदान व लिंगनिवडीस प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र आणि नागरिकांनी संयुक्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गाडेकर यांनी शासन व भिवंडी मनपा प्रशासनाचेवतीने केले आहे.