भिवंडी महापालिकेचे विद्यार्थ्यी दिल्ली शैक्षणीक दौऱ्यावर..

भिवंडी

लोकसभा,राष्ट्रपती भवन भेट देणार..

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर महानगर पालिकेच्या विविध माध्यमिक शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना शैक्षणीक व देश कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने दिल्ली येथे महापौर महापालिका प्रशासनाचेवतीने पाठविण्यात आले आहे.महापौर नारायण चौधरी यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.


भिवंडी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत त्यांना अधिक शैक्षणिक ज्ञान प्राप्त व्हावे व देश कार्याची माहिती व्हावी आणि ते आपल्या जीवनामध्ये प्रगतिशील व्हावे या उद्देशाने भिवंडी महापालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी दिल्ली
शैक्षणीक सहल आयोजीत करण्याची घोषणा जाहीर केली होती, त्यानुसार आज सोमवार दुपारी दिल्ली येथे शैक्षणीक सहलीसाठी निघालेल्या बस गाडीला महापौर नारायण चौधरी,आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यां शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी उपमहापौर तारीक अब्दुल बारी मोमीन,आ.रईस शेख,स्थायी समिती
सभापती ॲङ इशा मिस्बाह इमरान खान
उपायुक्त बाळकृष्ण क्षिरसागर,सहायक आयुक्त नितीन पाटील पालिका अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी महापौर नारायण चौधरी व आयुक्त यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक उपक्रमाची योग्य माहिती घेणे संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले.
महानरगपालिकेच्या विविध माध्यमिक शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांना शैक्षणीक सहलीसाठी दिल्ली येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती महापौर चौधरी यांनी दिली. महानगरपालिका संचलित एकूण 11 माध्यमिक विद्यालय सध्या कार्यारत असून त्यामध्ये मराठी माध्यम 4, उर्दु माध्यम 4, तेलुगु माध्यम 2, आणि हिन्दी माध्यम 1 अशा विविध माध्यमांचे विद्यालय आहेत. या विद्यालयातील इयत्ता 9 वी व 10 वी च्या वर्गातील 16 विद्यार्थी 02 शिक्षक व 01 अधिकारी असे एकूण 19 जणांच्या संघाचा दिल्ली येथे शैक्षणीक दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
सदर दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संघराज्याची सर्वोच्च कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच संसदेच्या कार्यप्रणालीची ओळख व्हावी. तसेच जगातील सर्वात माठी लोकशाही प्रणाली असलेल्या देशाच्या प्रमुखाचे लोकसभा कार्यालय आणि राष्ट्रपती भवन दिल्ली येथे पाहणार आहेत,या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थीदेखील चांगला
अभ्यास करतील त्यांना देखील पुढील वेळी संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली, शैक्षणीक सहलीवरुन परत आल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना काय अनुभव आले हे जाणून घेणार असल्याचे महापौर व आयुक्तांनी सांगितले.