भिवंडीत लाख मोलाचा दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक सुसज्ज..

भिवंडी

शिवसेना भाजपासह विविध सामाजिक संस्थाकडून ” हंडी महोत्सव ” आयोजन.

भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात दरवर्षी सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये व धुमधडाक्यात साजरा होत असतो, या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी खाजगी व सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाच्यावतीने दहीहंडी उभारण्यात येतात,त्यामुळे यंदा उत्सवासाठी मंडप,
सजावट व देखावे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे,येत्या शनिवार 5 सप्टेंबर 2026 रोजी दहीहंडी उत्सव होणार असल्याने भाजप व कपिल पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील,शिवसेना (ठाकरे) माऊली ग्रुपचे प्रमुख करसन ठाकरे,शिवसेना पक्ष (शिंदे )धर्मवीर मित्र मंडळाचे प्रमुख सुभाष माने,डी.वाय फाऊंडेशन दयानंद चोरघे सामाजिक संस्था,महेंद्र समाजकल्याणकारी संस्था अध्यक्ष माजी आमदार रूपेश म्हात्रे,मनसेचे डी.के.म्हात्रे, शिवशक्ती मंडळ अशा विविध सार्वजनिक व खाजगी मंडळाच्यावतीने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्तेचे बैठका घेऊन उंच उंच दहीहंडी उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

या हंड्या फोडण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील गोविंदा पथक सुसज्ज झाली असुन दररोज रात्री मानवी मनोरे उभे करून तरूण युवक सराव करीत आहेत. यंदा महिला गोविंदा पथक सुद्धा दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत असल्यामुळे युवती सुद्धा हंडी फोडण्यासाठी सराव करीत आहे.
भिवंडी शहर परिसरात लहान व मोठ्या खाजगी आणि सार्वजनिक अशा 100 हुन अधिक मंडळाकडून विविध ठिकाणी दहीहंडी उभारण्यात येतात त्यामुळे या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक सुसज्ज होऊन बाहेर पडत असतात यंदा कपिल पाटील फाऊंडेशन – भाजप,शिवसेना माऊली ग्रुप,शिवसेना धर्मवीर मित्र मंडळ,
डी.वाय.फाऊडेशन,
मनसे,महेंद्र कल्याणकारी संस्था व सार्वजनिक मंडळाच्यावतीने हंडी फोडणाऱ्या पथकाला लाख रुपयांचे बक्षीस व सन्मान चिन्ह,आकर्षक चषक देणार असल्यामुळे गोविंदा पथकामध्ये उत्साहाची लाट पसरली आहे दोन लाखापासून 50 हजार रुपये व हजारो रोख रक्कमेची बक्षीस 5 ते आठ,नऊ थर लाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना देण्यात येणार आहेत,त्यामुळे उंच मानवी थर मनोरे लावण्यासाठी विविध गोविंदा पथकातील युवकाची स्पर्धा लागली आहे. दहीहंडी फोडताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी उत्सव मंडळाकडून काळजी घेतली जात असून सीट बेल्ट व अंडी फोडण्याच्या ठिकाणी विशेष डॉक्टरांचे व वैद्यकीय सेवेचे पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.दही हंडी उत्सव निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,आमदार, खासदार,नेते तसेच चित्रपट सृष्टीतील कलाकार सुद्धा या उत्सवाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे ठीक ठिकाणी बॅनरबाजी सुरू झाली आहे. प्रसंगी अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.