भिवंडी (बी.एस.) श्री संत शिरोमणी नामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा आज भिवंडी
सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सर्वत्र मुर्ती अभिषेक,
भजन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
भिवंडी शहरातील श्री गोपाळकृष्ण मंदिर सभागृहात सकाळी संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त ह.भ.प.भागवताचार्य श्री.गणेश महाराज पुलकुंठवार किर्तन सोहळा व महाआरती करण्यात आली.

निमित्ताने भिवंडी चे आमदार महेश चौगुले विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.नामदेव
महाराज व विठ्ठल-रखुमाई मुर्तीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांची सत्कार करण्यात आला. तर
समाजाचे अध्यक्ष महेंद्र माडकर,
नंदकुमार वेल्हाळ यांच्या हस्ते ह.भ.प.भागवताचार्य श्री.गणेश महाराज पुलकुंठवार व आमदार महेश चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व भाविक उपस्थित होते.
चौकट
भिवंडी,कल्याण सह डोंबिवली, ठाणे, वाडा,पालघर, जव्हार सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातसह संजिवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती ठाणे जिल्हा
शिंपी उन्नती मंडळाचे प्रमुख रविंद्र कालेकर,माजी अध्यक्ष भानुदास भसाळे यांनी दिली.
