भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगा कडून मोठ्या प्रमाणावर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
भिवंडी पश्चिम विधानसभा अंतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रमांतर्गत स्विप कक्ष भिवंडी यांच्या मार्फत बी.एन.एन महाविद्यालय येथे मतदार जनजागृती अंतर्गत मतदार झालेल्या युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी उदय किसवे तसेच तहसीलदार अभिजीत खोले यांनी मार्गदर्शन केले.सर्व युवक मतदारांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करीत युवकांना आयुष्य घडवताना या विषयावर उदय किसवे यांनी आपले मनोगत मार्गदर्शन व्यक्त केले.याप्रसंगी भिवंडी महानगर पालिका सहाय्यक उपायुक्त सुनील झळके व स्वीप कक्ष समिती सदस्य भामरे,परदेशी,सातपुते,जाधव,पाटील,तुपांगे,मुळे, राठोड यांसह सुमारे 300 युवक नव मतदार उपस्थित होते.बी एन एन
महाविद्यालयाचे प्रा.दिलीप काकविपुरे,प्रा.पाईकराव, यावेळी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ.सुधीर निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.