भिवंडी (प्रतिनिधी) काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाऱ्यांची जननी आहे आणि तिच्याशी निगडित लोक भ्रष्ट आहेत.ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये मतदारांनी भाजप पक्षाला बहुमत देऊन विकास काम करण्याची संधी दिली त्याच प्रमाणे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून बहुमतानी विजयी करून राज्यात पूर्ण बहुमताने भाजप महायुतीचे सरकार स्थापन करा असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी भिवंडीत झालेल्या प्रचार सभा व राजस्थानी प्रवासी संमेलनात केले.

भिवंडी पुर्व आणि पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेना व भाजप महायुतीच्यातीने निवडणूक लढविणारे उमेदवार संतोष शेट्टी व महेश चौघुले यांच्या प्रचार करण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची जाहीर सभा संमेलन भिवंडीतील अंजूरफाटा येथील मैदानात आयोजित करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील,भाजप शहरध्यक्ष हर्षल पाटील,माजी नगरसेवक निलेश चौधरी,गुजरातचे माजी मंत्री वासनभाई अहिर,सज्जन राजपुरोहित राजस्थान,महायुतीचे
उमेदवार संतोष शेट्टी व महेश चौघुले आदि मान्यवर पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते. विद्यमान आमदार महेश चौघुले यांनी आमदारकीच्या माध्यमातून भिवंडी पश्चिम मतदारसंघात विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत त्यामुळे ते लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात तर शिवसेनेच्यावतीने भिवंडी पुर्व मतदार संघातून संतोष शेट्टी हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे भिवंडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी यावेळी उपस्थित मतदार व नागरिकांना केले.या सभेला महिलासह नागरिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केल्याने मुख्यमंत्री शर्मा हे आनंदीत झाले होते त्यांनी सांगितले की “जिथे गाड्या जाऊ शकत नाहीत , बैलगाड्या जातात” आणि कुठे बैलगाडी गेली किंवा मारवाडी कुठेही राहिले तरी त्यांचा विजय निश्चित आहे, त्यामुळे महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री शर्मा यांनी व्यक्त केला.यावेळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राजस्थानी समाजाच्यावतीने भिवंडी पूर्वे उमेदवार संतोष शेट्टी व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश चौघुले यांना विजयी करण्यासाठी उपस्थितीता कडून
शपथ वदवून घेतली.यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सह मान्यवरांनी सुध्दा आपली मनोगत व्यक्त केली.
