उत्तराखंडचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात..
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी पूर्व विधानसभा आणि भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने सतर्कपणे कामकाज सुरू झाले आहे,येत्या 20 नोव्हेंबर बुधवारी विविध मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया होणार असल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,
सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेऊन निवडणुका मतदान प्रक्रिया शांतता व निर्भय वातावरणात पार पाडाव्यात याबाबतीत मौलिक सूचना दिल्या त्या अनुषंगाने भिवंडी पोलीस उपायुक्त मोहन दहीकर,
सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागात रूट मार्च करून मतदारांनी नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे असा संदेश दिला या रूटमार्च मध्ये भिवंडी पोलीस बरोबरच उत्तराखंडाचे पोलीस अधिकारी व महिला कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते त्यामुळे हे रूटमार्च बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


भिवंडी पूर्व विधानसभा आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोमामध्ये सुरू असून सत्ताधारी व विरोधकांकडून टीका टिपणी व शाब्दिक आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत, त्यामुळे काही प्रमाणात राजकीय वातावरण तप्त होत ढवळून निघाले आहे,एकमेकांचे बँनर पोस्टर फाडण्याचे प्रकार होऊ लागल्याने पोलिसांनी नोंद घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शिवसेना,भाजप,
काँग्रेस,समाजवादी पक्ष,ए.एमआयएम,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,बसपा अशा विविध पक्ष व अपक्ष उमेदवार आपल्या शेकडो समर्थकासह रस्त्यावर उतरून प्रचार रँली व जाहीर सभा घेत आहेत.
त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.
आगामी होणारी मतदान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा सतर्क झाले असून निवडणूक दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त सुरू केली आहे.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पोलीस उपाआयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त त्याचबरोबर सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सोबत चर्चा करून निवडणूक कामकाजाचा व मतदाना केंद्र बाबत आढावा घेतला बुधवार 20 नोव्हेंबर रोजी शहरातील विविध भागात असलेल्या मतदान केंद्रावर वरील बुथ मध्ये मतदान होणार आहे ही मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व निर्भय वातावरणात संपन्न व्हावी यासाठी भिवंडी पोलीस परिमंडळ -2 यांच्यावतीने पोलिसांनी शहरातील कामतघर वराळादेवी तलाव,धामणकर नाका, गौरीपाडा,
रोषण बाग,छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ नगर रोड, वंजारपाटी नाका, भिवंडी एसटी रोड,गैबीनगर, शांतीनगर अशा विविध भागात पदयात्रा काढून रूटमार्च केले या रूटमार्च मध्ये सीआरपीएफ, एस,आर,पी व उत्तराखंडचे पोलीस अधिकारी,महिला व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.संवेदनशील असलेल्या भागातील मतदान केंद्राची पाहणी करून तेथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.तसेच मतदारांनी निर्भय वातावरणात कायद्याचे पालन करून मतदान करावे असे आवाहन पोलीस आयुक्त डुंबरे यांनी केले आहे.