शांतीदुत परिवार संस्थेच्यावतीने सचिन खेडेकर,समीर चौघुले,विशाखा सुभेदार यांना सेवा रत्न पुरस्कार..

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे ) संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणाऱ्या ” शांतीदुत परिवार ” या संस्थेच्या माध्यमातून नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा व सम्या सम्या मैफिलीत माझ्या ” फेम सुप्रसिद्ध सिने अभिनेते समीर चौघुले यांचा कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असल्यामुळे “शांतीदूत सेवा रत्न”पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यामुळे मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


   महाराष्ट्र शांतीदूत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव (सेनि) यांच्या हस्ते बालगंधर्व  रंग मंदिर येथे नागरी सत्कार करण्यात आला.या वेळी शांतीदूत परिवाराचे पदाधिकारी प्रा. इंद्रजीत भोसले, राष्ट्रीय महिला  अध्यक्ष विद्याताई जाधव,
तृषाली जाधव,शितल चौधरी,डॉ.योगेश्वरी कराळे,रोहिणी कोळेकर,प्रा.विलास कदम,मधुकर चौधरी, नितीन दुधाटे,मितेश भोसले,विजय ठुबे, व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य ही संताची भूमी आहे येथे नेहमी कलाकारांच्या गुणांना प्रोत्साहन दिले जात आहे.केंद्र व राज्य शासन नेहमी कलाकारांचा गौरव करत असते त्याच प्रमाणे शांतीदुत परिवार सुध्दा शालेय विद्यार्थी,होतकरू महिला,खेळाडू व कलाकारांचे गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यासाठी नेहमी सक्रिय असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.विठ्ठलराव जाधव यांनी या कार्यक्रमात दिली. झालेल्या भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमात कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत  असल्याबद्दल शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार देऊन
समीर चौघुले यांचा गौरव करण्यात आला.कोविड च्या भयंकर तणावाच्या काळात समीर चौघुले व त्यांच्या संपूर्ण हास्यजत्रा कलाकारा  रसिकांना मदत व आनंदाचे क्षण उपलब्ध करून दिले.त्यामुळे त्याचे व संपूर्ण टीम चे हे ऋण अविस्मरणीय आहेत असे गौरव उद्गगार जाधव यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व नागरिकांसह शांतीदुत परिवाराचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
————-
   चौकट
शांतीदुत परिवार संस्थेचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सदस्य व पदाधिकारी काम करीत आहेत. रक्तदान शिबिर,
अवयव दान शिबीर,
आरोग्य चिकिस्सा शिबिर,
योग साधना,ध्यान शिबीर,
सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर महाराष्ट्रातील महापुरुष यांच्या जयंती उत्सव सारखे कार्यक्रम करीत असतात जेष्ठ सिने अभिनेते सचिन खेडेकर,प्रशांत दामले,सिनेअभिनेत्री विशाखा सुभेदार यांना सुद्धा यापूर्वी संस्थेने पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे.अशी माहिती यावेळी डॉ.विठ्ठल जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *