वीज नियामक आयोगाने वाढविलेल्या वीज दराला न्यायालयाची स्थगिती,

भिवंडी

भिवंडीकर यंत्रमाग कारखाना होईल फायदा का ???


भिवंडी  (प्रतिनिधी) शासन व वीज नियामक आयोगाने वीज दरवाढ केल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच बरोबर येणारी भरमसाठ वीजबीला मुळे व्यवसाय उद्योगास उतरती कळा लागल्याने ते चिंताग्रस्त झाले होते त्यातच वीज दरवाढीने आधीच मेटाकुटीला आलेल्या यंत्रमाग धारकांसह सर्व क्षेत्रातील वीज ग्राहकांवर वीज नियामक आयोगाने २५ जून २०२५ रोजी पासून लादलेल्या वाढीव वीज बिला विरोधात ग्राहकांने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने वीज नियामक आयोगाला झटका देत वाढीव वीज दरवाढ स्थगित दिली आहे.ज्यामुळे यंत्रमागधारकांना एप्रिल २०२५ प्रमाणे वीज दर लागू होणार असल्याची माहिती यंत्रमाग व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी तिरुपती शिरपूरम यांनी दिली आहे.
न्यायालयाने दिलेल्या स्थगिती निर्णयामुळे भिवंडीत वीजपुरवठा व वीजबिल वसुली करणाऱ्या टोंरट पावर कंपनीच्या व्यवस्थापकां मध्ये खळबळ माजली आहे.
      वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.कडून जून २०२५ पासून वीज दरवाढ करण्यात आली होती.
याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या पुनरावलोकन आदेशाला आव्हान दिले होते,यामध्ये भागधारकांचे म्हणणे न ऐकता पुनरावलोकन आदेश मंजूर केला,जे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन होते.ज्यामुळे वीज ग्राहकांवर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचा आक्षेप घेतला होता.त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने वीज नियामक आयोगाचे वीज दरवाढीचे आदेश रद्द ठरवले आहेत.परंतु यावर वीज वितरण कंपनीने आव्हान देण्यासाठी वेळ मागून घेतल्याने या निर्णयास चार आठवड्यां साठी स्थगिती दिली आहे.या आदेशामुळे भिवंडीतील यंत्रमाग कारखाना फायदा होऊ शकतो अशी माहिती तिरुपती  यांनी दिली आहे.
एप्रिल मध्ये यंत्रमाग धारकांना २.८० पैसे वीजदर होते.जे जून मधील दरवाढीमुळे ३.९० पैसे एवढे वाढले होते.पण न्यायालयाच्या आदेशाने हे वाढीव वीजदर वाढ रद्द झाल्याने यंत्रमाग धारकांना वाढीव वीजदराची वाढीव रक्कम परत मिळू शकते अशी शक्यता शिरपूरम यांनी बोलून दाखवली आहे.वीज दरवाढी च्या निकाला संदर्भात वीज वितरण कंपनीकडून अजून कोणतेही अधिकृत माहिती अथवा पत्र आले नसल्याची माहिती टोरंट पॉवर कंपनीच्या जनसंपर्क विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *