भिवंडी ( शरद भसाळे ) पोलीस स्मृती दिवस व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाणे व भिवंडी शहर पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने सभागृहात शहरातील पोलीस दलात भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी,नागरिक व शांतता समिती सदस्यांनासाठी शस्त्र माहिती व प्रदर्शन कार्यक्रम व एकता दौड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशा नुसार ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस उपाआयुक्त कार्यालयात अंतर्गत विविध पोलीस ठाणे अंतर्गत दि.21 ते 31 दरम्यान पोलीस स्मृती दिवस व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन भिवंडी पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील निजामपूरा व शहर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस सभागृहात नागरिकांना पोलीस सेवा कार्याची माहिती व्हावी त्याचबरोबर शस्त्र माहिती व प्रदर्शन कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता,यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास ढगळे व कृष्णदेव खराडे यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन करून कार्यक्रमाची माहिती दिली त्याचबरोबर आज गुरुवारी सकाळी शहरातील कामतघर येथील वराळदेवी घाट येथे “एकता दौड”
आयोजित करण्यात आली होती. वराळादेवी घाट येथुन सुरू झालेली दौड कामातघर – घाट, फेणे घाट – आयुक्त बंगला – वराळ देवी मंदिर – पुन्हा वराळादेवी घाट या ठिकाणी समाप्त झाली या चुरशीच्या स्पर्धेत 1) आर्यन राजेश गुप्ता (वय 23),2) कृष्णा सुमित सिंग (वय 18),3) विजय मानसिंग चव्हाण (वय:22) यांनी विजेतेपद मिळवले त्यांना 31 ऑक्टोबर रोजी पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या स्पर्धेत 75 जणांनी सहभाग घेतला.याकार्यक्रमास स्थानिक नागरिकांसह, पोलीस मित्र,शांतता समीती सदस्य,भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी व पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

