भिवंडी महापालिकेने तयार केले 12त्रकृत्रिम तलाव,महापौरासोबत पोलिसांनी केली विसर्जनांची स्थळांची पाहणी

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात
सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली असुन ठिकठिकाणी मोठ्या गणेश मूर्ती आणून मंडपात विराजमान झाल्या आहेत त्यामुळे मोठे मंडप व देखावे उभारण्याचे काम सुरू आहे.गणेशोत्सव मंडळ व नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर नारायण चौधरी यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त प्रशासन सुसज्ज झाले आहे.त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार भिवंडी पोलीस प्रशासन सुध्दा सज्ज झाले आहे.


महापौर चौधरी व आयुक्त अनमोल सागर यांनी आपल्या पथकासह शहरातील मिरवणूक मार्ग व विविध ठिकाणी विसर्जन स्थळाची पाहणी करून कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्रुटी असलेल्या ठिकाणी व्यवस्थित काम करण्याचे सुचना दिल्या आहेत.
यावेळेस शहरातील विविध भागातील विसर्जन घाट स्थळावर व १२ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने आपल्या सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे असे आवाहन पालिका आयुक्त अनमोल सागर व महापौर चौधरी यांनी केले आहे.महापालिका महापौर नारायण चौधरी, आयुक्त अनमोल सागर पोलिस उप आयुक्त डॉ.पवन बनसोड,
उपायुक्त विक्रम दराडे,पाणी पुरवठा अभियंता संदीप पटनावर, प्रभाग अधिकारी नितेश चौधरी,विनोद मते,विनोद मनोरे, गिरीश घोष्टेकर,
बांधकाम अभियंता जमील पटेल,सचिन नाईक,एसीपी मिलिंद शिंदे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे,विजय कदबाने,
विनोद पाटील,विक्रम मोहीते, गणेशोत्सव महामंडळाचे मदन भोई अदि मान्यवर यांनी वऱ्हाळ तलाव, कामतघर व फेणे गाव,लोकमान्य टिळक घाट,शेलार,
भादवड,नारपोली अशा विविध विसर्जन घाटावर जाऊन विसर्जन स्थळ व्यवस्थेचा आढावा घेतला. श्रीगणेश आगमन व विसर्जन मार्गाच्या रस्ते दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले असून डांबरीकरण करून,खडी ग्रीट,डांबरीकरण पद्धतीने रस्ते दुरुस्ती करण्यात आली आहे.तर काही भागात फेवरब्लॉक लावण्यात आले आहेत.तसेच गणपती विसर्जन करीता आवश्यक घाट दुरुस्तीची कामे पुर्ण करण्यात आली आहेत.कृत्रिम तलावांसाठी भाडेतत्त्वा वर टँकर च्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे . तसेच पाणी स्वच्छता करण्याचे निर्देश महापौर चौधरी यांनी दिली.प्रत्येक विसर्जन घाटांवर महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांचे नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. विसर्जन घाटांवर नागरिकांच्या सुरक्षितते साठी अतिरिक्त विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्यात येणार आहे.वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटर व्यवस्था करण्यात आली आहे.मिरवणूक वेळी निरीक्षण करणे करीता वॉच टावरची व्यवस्था करण्यात येते.कायदा व सुव्यवस्था राखणे करीता पोलीस विभागाच्या मागणी नुसार सीसीटीव्ही कॅमेरेची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले, विसर्जन घाटावर दीड दिवसांसाठी १५५ कर्मचारी,पाच दिवसांकरिता २६४ कर्मचारी व दहा दिवसांकरिता ३०८ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या पूर्वी तलावतील गाळ साफ करून त्यामध्ये पोटॅशियम परमँगनेट फवारणी करून पाणी निर्जंतु करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

१२ विसर्जन घाट,१२ कृत्रिम तलाव
१८ तराफे,८० जीवरक्षक..
पालिकेच्या पाच प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या १२ विसर्जन घाटां वर १२ कृत्रिम तलाव बनविण्यात आले असून मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी १८ तराफे ठेवण्यात आलेले आहेत.गणेशमूर्तीचे विघटन जलदगतीने व्हावे यासाठी अमोनिम बाय कार्बोनेट याचा वापर करण्यात येणार आहे.तर शहरातील प्रत्येक विसर्जन घाटांवर निर्माल्य गोळा करण्याकरिता निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात येत आहे.अग्निशमन विभागामार्फत ८० जीवनरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना ओळख पत्र देऊन सर्व जीवनरक्षकांचा पोस्ट कार्यालया मार्फत विमा देखील काढण्यात येणार आहे.मागील वर्षी पालिका प्रशासन कडून दहा कृत्रिम तलाव बनवण्यात आली होती.ज्यामध्ये ७०९ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते.यंदा ही संख्या वाढवून १२ कृत्रिम तलाव बनविण्यात आले आहेत.लोकमान्य टिळक घाट (नदी नाका),व-हाळ देवी तलाव घाटच्या बाजूला,कामतघर घाट काटेकर मैदान समोर रामनगर,गायत्री नगर,भादवड येथे बैलजोडीच्या बाजूला,मंगलमुर्ती कॉम्प्लेक्स परिसर टेमघर,अरिहंत कॉम्प्लेक्स परिसर,राजीव गांधी चौक परिसरात अंजूर फाटा, नारपोली गाव परिसर,
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर,चाचा नेहरू परिसर, नारपोली तलाव परिसर या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.