भिवंडीत ठिकठिकाणी दहीहंड्या फोडून युवकांनी केला जल्लोष..मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक..

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे ) गोविंदा रे गोपाळा अशा गगनभेदी घोषणा देत आज शनिवार (दि.6)रोजी सकाळपासून विविध गोविंदा पथक ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात रस्त्यावर उतरले होते, रस्त्यावरील चौकात विविध खाजगी व सार्वजनिक मंडळाच्यावतीने ठीक ठिकाणी उभारण्यात आलेल्या छोट्या मोठ्या उंचीवर असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकातील युवकांनी आपले 5 ते 6 मानवी मनोरे रचून या दही हंड्या फोडून मोठा जल्लोष केला.

यावेळी प्रोत्साहन म्हणून गोविंदा पथकाला आयोजकांकडून रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येत होते.विशेष म्हणजे युवा महिलावर्ग सुध्दा हंड्या फोडण्यासाठी आपल्या पथकासह रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसत होत्या.अधूनमधून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने गोविंदा पथका मध्ये ऊर्जा निर्माण करत होता,दरम्यान दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ,आमदार.महेश चौघुले,आ.निरंजन डावखरे,महाराष्ट्र गोवा वकील संघटनेचे सदस्य अँड.हर्षल पाटील,अँड. वैभव भोईर,भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य देवेंश पाटील, सिध्देश पाटील, व मान्यवर उपस्थित होते.


शिवसेना माऊली ग्रुप करसन ठाकरे मित्रमंडळ,
कपिल पाटील फाऊंडेशन सुमित पाटील,शिवसेना शंभुराजे प्रतिष्ठान सुभाष माने धर्मवीर मित्र मंडळ, दयानंद चोरघे डी.वाय.
फाउंडेशन,महेंद्र कल्याणकारी संस्था शिवसेना माजी आमदार रुपेश म्हात्रे,संजय म्हात्रे मित्र मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा विविध मंडळाच्यावतीने लाखो रुपयांचे परितोषिक व चषक लावलेल्या उंच उंच दहीहंडी सायंकाळी उशीरा फुटणार असल्याने अनेक गोविंदा पथक मंडळ त्या ठिकाणी जाऊन मानवी उंच मनोरे थर लाऊन आपली सलामी देऊन नोंद करीत होते.शहर व ग्रामीण भागात छोट्या मोठ्या उभारण्यात आलेल्या सायंकाळी उशीरापर्यंत शेकडो दहीहंडया फोडून गोविंदा मंडळाने रोख रक्कम बक्षीस व सन्मान चिन्ह मिळवून जल्लोष करीत होते.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी लाखो रुपयांची बक्षीस व चषक सन्मानचिन्ह पारितोषिक दर्शविणारी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, अधूनमधून पाऊस येत असल्याने गोविंदा पथकांचा उत्साह व जल्लोष मोठा वाढला होता.वाहतूक व्यवस्था चोख होती मात्र अनेक लोकांच्या बेशिस्तीमुळे अनेक ठिकाणी वाहन कोडी होत होती, उत्सवामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा,नवतरुण मित्र मंडळ,समर्थ मंडळ व्यायाम शाळा, शेलार मित्र मंडळ,जय हनुमान मित्र मंडळ, डायमंड मंडळ, मराठा मंडळ,
गावदेवी केवणी,ज्ञानदीप मंडळ अशा विविध मंडळ आपल्या गोविंदा पथकासह रस्त्यावर उतरून दहीहंडी फोडून जल्लोष करत होते.
गोविंदा पथकांना आकर्षित करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष, कपिल पाटील फाऊंडेशन यांच्यावतीने
छत्रपती शिवाजी महाराज चौक,शिवसेना माऊली ग्रुप करसन ठाकरे मंडळ राजनोली चौक.
शिवसेना शंभूराजे प्रतिष्ठान धर्मवीर मंडळ यांच्यावतीने स्व.आनंद दिघे चौक,शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने कल्याण रोड भादवड नाका चौक अशा विविध ठिकाणी लाखो रुपयांचे पारितोषिक व रोख रक्कम चे उंच उंच दहीहंडया उभारण्यात आले होते.मनपा महापौर नारायण चौधरी,आमदार महेश चौघुले,शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यासह मान्यवरांनी दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी भेटी देऊन गोविंदा पथकाला व आयोजकांना शुभेच्छा व्यक्त केल्या त्यामुळे सदर दहीहंडी फोडण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती.या महाउत्सव निमित्त शिवसेना नेते प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या सह विविध राजकीय पक्षांचे आमदार,
पदाधिकारी आणि चित्रपट अभिनेते,अभिनेत्री उपस्थित राहण्यास असल्यामुळे महिला व नागरिकांनी उत्सवाच्या ठिकाणी दहीहंडी
उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.