महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्षांची मागणी..
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी महानगर शहर पालिकेत ९० नगरसेवक निवडून आले असून सध्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविले आहेत. मात्र पालिकेकडे दाखल अर्जांची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून दडवून ठेवल्याचा मुद्दा सध्या भिवंडी शहरात चर्चेचा विषय बनला आहे.पालिकेचे आजी व माजी नगरसेवक तसेच नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या या गलथान लुकाछपी कारभारा बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.भिवंडी महापालिका प्रशासनाकडे २८ सप्टेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या सुमारे ३६ स्वीकृत सदस्यांच्या अर्जांची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दडवून ठेवल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शासन लघु उद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मोहम्मद तारिक फारुकी यांनी दिली असुन याबाबत नाराजी व्यक्त करीत थेट त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना लेखी पत्राद्वारे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून स्वीकृत नगरसेवकांच्या कायदेशीर पात्रतेची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे सर्व राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेतील एकूण ९० नगरसेवकांपैकी ३० काँग्रेस सदस्य,२२ भाजप सदस्य, १२ राष्ट्रवादी (शप) सदस्य, १२ शिवसेना सदस्य, ६ समाजवादी पक्ष सदस्य, ४ कोणार्क विकास आघाडी सदस्य, ३ भिवंडी विकास मंच सदस्य आणि एक अपक्ष नगरसेवक यांचा समावेश आहे.शासन निर्देश
नुसार विविध राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार,भिवंडी शहर महानगर पालिकेत एकूण ९ मंजूर स्वीकृत सदस्य (नगरसेवक) असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काँग्रेसचे ३, भाजपचे २, शिवसेनेचे १, समाजवादी पक्षाचे १, राष्ट्रवादी काँग्रेसचे १ आणि कोणार्क विकास आघाडीचे १ नगरसेवक मंजूर आहेत.मात्र महापालिका प्रशासनाचा प्रशासन मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहे,अशी माहिती माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य शासन लघु उद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मो. तारिक फारुकी यांनी दिली
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिका कायद्यानुसार, केवळ संबंधित पक्षाच्या गट नेत्यानेच आपले मान्यताप्राप्त नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्याचे पुष्टी करणारे अधिकृत पत्र महानगरपालिका प्रशासनाला देणे बंधनकारक आहे.मात्र महापालिका प्रशासन स्विकृत सदस्य बाबतीत किती अर्ज दाखल झाले,कोणत्याही पक्षाचे किती उमेदवार आहेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती पालिकेचे नगरसेवक,
माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते,
नागरिकांना देत नाहीत त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालिकेकडे सध्या ३६ अर्ज दाखल झाले आहेत,अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. महापालिकेच्या कार्यालयातून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर न झाल्याने २८ सप्टेंबरनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अर्जांविषयी अधिकृत माहिती मागितली होती. मात्र याबाबत त्यांनी
असमर्थता दर्शविली त्यामुळे गंभीर संशय निर्माण झाला आहे. शहरातील काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील हि माहिती न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र
राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक मो. तारिक फारुकी होणाऱ्या
या नियुक्ती बाबतीत शासन व ठाणे जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून पारदर्शक कारभार करण्याची मागणी केली आहे.मान्यताप्राप्त स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी संबधीत व्यक्ती डॉक्टर,
वकील,अभियंता, माजी नगरसेवक,स्वयंसेवी संस्थेचा अधिकृत सदस्य किंवा माजी शिक्षक असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे स्वीकृत सदस्यासाठी पात्रतेचे निकर्ष सरकारद्वारे निश्चित केले जातात. त्यामुळे महापालिकेतील आगामी स्वीकृत नगरसेवकाबाबत कोणते पाऊल उचलते याकडे भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.

