दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे दयानंद चोरघे यांनी केले आवाहन..
भिवंडी (शरद भसाळे ) ठाणे जिल्ह्यातील शहापूर,मुरबाड व पालघर जिल्ह्यातील काही गावात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकरी व आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत ही गंभीर बाब लक्षात घेता डी वाय फाउंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदत कार्य सुरू करावे असे निर्देश डी.वाय. फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दयानंद चोरघे यांनी आयोजित झालेल्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यात शैक्षणिक, आरोग्य सेवा व सामाजिक कार्य करणाऱ्या डी.वाय. फाऊडेशन संस्थेने 16 व्या वर्षांत पदार्पण केले आहे, त्यामुळे संस्थेचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष लोकनेते दयानंद चोरघे या उपस्थितीत गोपाला सभागृहात आयोजित करण्यात आला होता,प्रसंगी युवा नेते विरेन चोरघे,मोहन म्हणेरा,जिल्हाध्यक्ष शरद गोतारणे, योगेश पाटील, दिपक केणे,महेश धानके,जगदीश धुमाळ, देविदास केणे,नगरसेवक तारीक अंसारी, मनोहर तरे, तानाजी घागस,बाबा इमरान, कृष्णकांत तुपे अदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी. वाय.फाउंडेशन ही संस्था कार्यकर्त्यांच्या श्रमातून उभी राहिलेले आहे त्यामुळे या संघटनेचे काम व विस्तार वाढत आहे ही संघटना अधिक प्रमाणात कशी मजबूत होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत लोकनेते दयानंद चोरघे यांनी यावेळी व्यक्त केले, आगामी काळात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात विभाग प्रमुख, तालुका अध्यक्ष व गट प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.या संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी व गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्याचे भूमिका सक्रियपणे राहिली आहे,त्यामुळे येत्या काळात सुद्धा संघटनेच्या माध्यमातून लोकांना मदत करणे त्याच बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेले कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत व शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मेहनत घेतली जाईल अशी माहिती चोरघे यांनी यावेळी दिली,त्यासाठी त्यांनी सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी जाहीर केली.
महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख म्हणून महेश धानके यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच रोहित झुंजारराव, बाळा हुकमाळी, मनोहर तरे, बाबा इमरान, राकेश गोरे अशा विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा चोरघे यांनी केली.यावेळी युवा नेते विरेन चोरघे,मोहन म्हणेरा,जिल्हाध्यक्ष शरद गोतारणे व उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी
15 वर्ष गौरवशाली कामाचा आढावा घेऊन अधिक जोमाने काम करण्याचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम सुत्रसंचालन मनोहर तरे यांनी केले.भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ अशा विविध शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

