भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत गृह मतदानाला उद्यापासून गुरूवार दि.9 मे पासून सुरुवात होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दिव्यांग, कोविड बाधित मतदारांना त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या घरी टपाली मतदान, गृह मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कामकाज सुरू झाले आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दिव्यांग, कोविड बाधित मतदारांना त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या घरी टपाली मतदान, गृह मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानुसार अशा मतदारांना टपाली मतदानाचे नमुना 12 ड मधील अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यापैकी प्राप्त झालेल्या निर्णय घेण्यात आलेला असून मंजूर अर्जाची यादी नुसार उपरोक्त खालील विधानसभा निहाय मतदार संघाद्वारे 85 वर्षापेक्षा जास्त असलेल्या व दिव्यांग असलेल्या मतदारांच्या मतदान घेण्यात येणार आहे अशी माहिती संजय जाधव यांनी दिली. 134 भिवंडी ग्रामीण मध्ये दि. 9 व 10 मे व रोजी ८५ वर्षे पेक्षा जास्त असलेले 80 मतदार, व दिव्यांग मतदार 09, 135 शहापूर मध्ये दिनांक 9 व 14 रोजी 85 वर्षां वरील 62 तर दिव्यांग असलेल्या 8, 136 भिवंडी मध्ये दि. 10 व 14 मे रोजी 85 वर्षावरील 17 आणि दिव्यांग असलेले एकूण 3 मतदार, 137 भिवंडी पूर्व 10 व 14 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे यामध्ये 85 वर्षांमधील 14 आणि दिव्यांग असलेल्या असे 03 एकूण 17 मतदारांचा गृह मतदानाद्वारे मतदान घेण्यात येणार आहे, 138 कल्याण पश्चिम मध्ये दिनांक 11 व 12 मे रोजी दरम्यान 85 वर्षातील 35 आणि दिव्यांग असलेले 4 मतदार यांचे मतदान घेण्यात येणार आहे तर 139 मुरबाड मध्ये दिनांक 10 मे व 15 या दोन दिवसात 85 वर्षापेक्षा जास्त 34 आणि दिव्यांग असे 2, असे एकूण संपूर्ण लोकसभा मतदार क्षेत्रात हे 85 वर्षांवरील एकूण 242 तर 29 मतदार हे दिव्यांग मतदार म्हणून आहेत. या सर्व मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्र उभारून मतदान घेण्यात येणार आहेत. याकरिता मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या देखील नेमणुका करण्यात आल्या आहेत. याकरिता उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात याबाबत सर्व उमेदवार यांना उपस्थित राहण्याबाबत पत्र देखील देण्यात आली आहेत.या गृह भेटीसाठी 134 भिवंडी ग्रामीणमध्ये नऊ पथक, 135 शहापूर 10 पथक, भिवंडी पश्चिम मध्ये 2 पथक, भिवंडी पूर्वमध्ये 2 पथक, 138 कल्याण करिता 2 पथक 139 मुरबाड करिता 05 पथक अशी एकूण 32 पथक तयार करण्यात आली आहेत, या कामा करीता केंद्रीय निवडणूक आयोगाने 40 सूक्ष्म निरीक्षक यांची देखील नेमणूक केली आहे. या सर्व मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. गृह मतदानाकरता येणारे कर्मचारी हे त्यांचे ओळखपत्र लावून येतील त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. दि. 9 ते 15 मे दरम्यान गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
