भिवंडी (भानुदास भसाळे ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने कडून बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे अधिकारी वर्ग हैराण झाले आहेत.भिवंडी शहर महानगर पालिकेत पाच महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झालेले संजय हेरवाडे यांची तडकाफडकी बदली झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्याच बरोबर कालावधी पुर्ण झालेले उपायुक्त दिपक झिंजाड यांची सुध्दा बदली झाली आहे.सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाने अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू केले आहे.एका ठिकाणी तीन वर्षे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विचार केला जातो.पण नव्या नियमानुसार जिल्हा हे कार्यक्षेत्र निवडणूक आयोगाने विचारता घेतल्याने भिवंडी पालिकेत कार्यरत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड यांच्या बदल्या नगरविकास विभागाने केल्या आहेत.दीपक झिंजाड हे सुमारे तीन वर्षे पालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत असताना सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, आस्थापना व कर मूल्यांकन विभागातील कामाला शिस्त लावली होती. तर संजय हेरवाडे हे अवघ्या पाच महिन्यांपूर्वी भिवंडी पालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर रुजू झाले होते. आणि स्वच्छता संदर्भात शिस्त लावली.
पण तत्पूर्वी ते ठाणे जिल्ह्यातच कार्यरत असल्याने त्याची सुध्दा बदली करण्यात आली आहे.
