भिवंडी मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा हक्क.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नाही असे असताना ते कोणत्या आधारावर भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा करीत आहेत.भिवंडी लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे.येथे 6 वेळा पक्षाचे खासदार होते.त्यामुळे या जागेवर हक्क आहे.काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती भिवंडी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार रशिद ताहीर मोमीन यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.त्यामुळे पक्षाचेवतीने बुथ प्रमुख व अन्य निवडणूक विभाग कार्यकर्ते काम करीत आहेत असे असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघावर दावा करीत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी पक्ष कार्यालयात तातडीने पक्षाचे शहरध्यक्ष रशिद ताहीर मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन भिवंडी जागा काँग्रेस पक्ष लढविणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाचा भिवंडी बालेकिल्ला आहे. येथील मतदार हे मतदान करताना ईव्हीएम यंत्र मशीन वर पंजा चे चिन्ह शोधत असतात जर पंजा चे निशाणी दिसली नाही तर परंपरागत मतदार हा नेमका कोणाला मतदान करेल हे सांगता येणार नाही अशी माहिती रशिद ताहीर मोमीन यांनी दिली.भिवंडी काँग्रेस जागा हक्काची नाही कोणाची.. अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तेनी केली.भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मोमीन यांनी यावेळी दिली. प्रसंगी माजी नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती,आरशी आझमी,पंकज गायकवाड, विरेन चोरघे,रूखसाना कुरेशी,जानवी देशमुख, अराफत खान,अनंता पाटील अदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
