भिवंडी ग्रामीण अ.ज. मतदारसंघाच्या निवडणुकीचे प्रथम प्रशिक्षण संपन्न

भिवंडी



भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा निवडणुकीचे प्रचार यंत्रणा कार्यान्वित झाली असुन शासकीय यंत्रणा सुद्धा दमदारपणे काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे.ठाणे जिल्हाध‍िकारी व जिल्हा निवडणूक अध‍िकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव व सहाय्यक निवडणूक अधिकारी उदय किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आणि  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांच्या उपस्थितीत 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या 134 भिवंडी ग्रामीण मतदार संघामधील 2 हजार 9 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच नाशिक रोडवरील महापालिकेच्या फरहान खान हॉल, मिल्लत नगर  येथे ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व अलनुर गर्ल स्कुल मिल्लत नगर भिवंडी येथे ईव्हीएम हँण्डस् ऑन ट्रेनिंग संपन्न झाले.या मध्ये कर्मचारी व अधिकारी,शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत माहिती घेतली. निवडणूक अनुषंगाने हे प्रशिक्षण शिबीर दोन टप्यात घेण्यात आले.सकाळी 10:00 ते 12:00 व दुपारी 02:00 ते 04:00 या दोनही वेळांमध्ये ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व ईव्हीएम हँण्डस्ऑन ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना देण्यात आले. दोनही प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान अधिकारी,कर्मचारी यांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी दिशादर्शक फलक,हजेरी नियोजन फलक लावण्यात आले होते.तसेच वैद्यकीय पथकाची देखील प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपलब्धता होती. त्याचबरोबर भिवंडी महानगर पालिकेच्या अग्निशमन  विभागाचे फायर टेंडर फरहान खान हॉल येथे उभे करण्यात आले होते. फरहान खान हॉल शेजारी प्रशिक्षणासाठी पेंडॉल टाकण्यात आलेला होता.या पेंडॉलमधील मतदान अधिकारी, कर्मचारी यांना उन्हाळयाचा त्रास होवू नये म्हणून कुलर व फॅनची व्यवस्था प्रकारे करण्यात आलेली होती. तसेच  प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात करण्यात येऊन चहा व बिस्कीटचीही व्यवस्था करण्यात आलेली होती.प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे नियोजन हे चांगल्या प्रकारे केले होते अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी दिली.ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण
साध्या व सोप्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे दिले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  विकास गजरे यांनी दिलीत्यामुळे मतदान अध‍िकारी कर्मचारी व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी  प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.



सदर ठिकाणी कर्मचाऱ्यांना जेवण  व्यवस्था नसल्यामुळे महिलांसह कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले त्यामुळे काही कर्मचारी हे संबंधित अधिकाऱ्यांना न सांगताच प्रशिक्षण हॉल मधून निघून गेल्याचे समजते.

याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  विकास गजरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि शासनाचेवतीने कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतर सर्व भत्ते दिले जातात.जेवन संदर्भात कोणत्याही प्रकारची खर्चाची तरतूद नाही त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना जेवण न देता चहा व बिस्किटे पाणी अशी व्यवस्था करून ठेवली आहे. तसेच दोन सञा मध्ये हे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला त्यामुळे 83% टक्के कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *